Farmer loan waiver  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा

Khandesh Farmers : निधीची अडचण, तांत्रिक अडचण आदी कारणे बँका शेतकऱ्यांना सांगत आहेत. तसेच आम्ही आपल्या कर्जाची, आपण पात्र असल्याची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केली आहे.

Team Agrowon

Maharashtra Politics : खानदेशात अनेक शेतकऱ्यांना तत्कालीन आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. नंतरच्या युती सरकारने किंवा महायुतीने कर्जमाफीची आश्वासने दिली पण कर्जमाफी झाली नाही. यामुळे अनेकांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.

खानदेशात सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला. नंतर कोरोना व इतर संकटे आली व या योजनेची कार्यवाही संथ झाली. सरकार बदलले. शिंदेगटामुळे महायुतीकडे सत्ता आली.

निधीची अडचण, तांत्रिक अडचण आदी कारणे बँका शेतकऱ्यांना सांगत आहेत. तसेच आम्ही आपल्या कर्जाची, आपण पात्र असल्याची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केली आहे.

परंतु ती स्वीकारली जात नसल्याने किंवा अंतिम मंजुरी मिळत नसल्याने कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. अपलोड केलेली माहिती राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून स्वीकारली (अॅकसेप्ट) जाते. ही कार्यवाही झाल्यानंतर शासनाकडून संबंधित कर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्यात कर्जाचा निधी जमा केला जातो. यानंतर संबंधित शेतकरी कर्जमुक्त होतो. परंतु ही कार्यवाही केली जात नसल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे सात हजार व धुळे, नंदुरबारमध्ये सुमारे सहा हजार शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तसेच सुमारे एक लाख नियमित कर्जदार शेतकरी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीत दिले. कर्जमाफी होईल, या अपेक्षेने अनेकांनी पीककर्ज भरणे टाळले. परंतु कर्जमाफी झाली नाही. यामुळेदेखील थकित पीक कर्जदार शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT