Almatti Dam agrowon
ॲग्रो विशेष

Almatti Dam : 'अलमट्टी' उंचीला महाराष्ट्राचा विरोध नाही; खासदार पाटील यांच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर

Sangli MP Vishal Patil : अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये त्यावर फेरविचार व्हावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत काही दिवसांपूर्वी केली होती.

sandeep Shirguppe

Almatti Dam Karnataka Height : अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये त्यावर फेरविचार व्हावा अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत काही दिवसांपूर्वी केली होती. यावर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या सहीचे लेखी उत्तर मिळाल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली.

"कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जल लवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोऱ्यातील कोणत्याच राज्याने विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही. असे स्पष्टीकरण केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून लेखी स्वरूपात (ता.०९) मिळाले आहे". अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली.

यावेळी खासदार पाटील म्हणाले, "महाराष्ट्र सरकारने उंची वाढीच्या विरोधात प्रस्तावच सादर केलेला नाही. जल लवादाने उंची वाढीला मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रच काय तर कोणत्याच राज्याने (आंध्र प्रदेश, तेलंगणा) विरोध केलेला नाही. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी त्यावर फेरविचार केला जावा, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे लोकसभेत केली होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या सहीने त्याला लेखी उत्तर मिळाले आहे." खासदार पाटील यांनी सांगितले.

सांगली, कोल्हापूर जिल्हे होणार जलमय

अलमट्टी धरणाच्या बांधणीपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला. अलमट्टी धरणाची ५ मीटरने उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. धरणाची उंची वाढवल्यास पाणी पातळी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येणार असल्याचा दावा जलतज्ञांनी केला. यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना आणखी महापुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

कर्नाटकसाठी हितकारक पण पश्चिम महाराष्ट्रासाठी घातक

२००५ साली पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार उडवला. प्रचंड जीवित व वित्त हानी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. महापुराने पुणे –बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग काही दिवस बंद राहिला. कोल्हापूर शहरात बहुतेक भागांत पुराचे पाणी शिरल्याने निम्म्याहून अधिक शहर जवळपास ठप्प बनले. यानंतर २०१९ आणि २०२१ साली महापुराचा सामना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसला. अलमट्टी धरण हे कर्नाटकसाठी हितकारक असले तरी यामुळेच पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पावसाळ्यात पाण्याखाली येतो हे नित्याचे बनले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT