Agriculture Education agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education : विद्यार्थ्यांना आता पहिलीपासूनच कृषी शिक्षणाचे धडे, नवा मसुदा तयार

Agriculture Education Maharashtra : कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत.

sandeep Shirguppe

Maharashtra government : राज्यात विद्यार्थ्यांना आता कृषी शिक्षणाची माहिती देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच पहिलीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक प्ररस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित 'आधु‌निक कृषी शिक्षणाची संधी: भविष्याची उज्ज्वल नांदी' या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यावहारिक शेती केली तर चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले की, भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून, चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे.

याचबरोबर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी कृषी विद्यापीठांशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या-त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असेल असे मंत्री केसरकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT