Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Subsidy : राज्यातील ६ लाख गाय दूध उत्पादकांना ९० कोटींचे अनुदान जमा

Maharashtra Cow Milk : राज्यात गायीच्या दुधाचे दर कमी झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

sandeep Shirguppe

Cow Milk Rate : राज्यात गायीच्या दुधाचे दर कमी झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान यावर राज्य सरकारने दूध उत्पादकांना गायीच्या दूधाला ५ रूपये अनुदान देण्याचे ठरवले. यामध्ये राज्यातील सहकारी दूध संघांना हे अनुदान देण्यात आले आहे. राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती राज्य दुग्ध विभागाकडून देण्यात आली आहे.

याचबरोबर राज्याचे दुग्ध सचिव तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दूध अनुदानाचे काम वेगाने व बिनचूक पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत ९० कोटींचे अनुदान वर्ग झाले, तर उर्वरित अनुदान लवकरच जमा होईल अशी माहिती राज्याचे दुग्ध विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी माहिती दिली.

गायीच्या दुधाचे दर घसरल्यानंतरही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संस्थांनी प्रतिलिटर ३३ रुपये दर देत आहेत. परंतु राज्यातील अन्य ठिकाणी खासगी दूध संघ तर २५ ते २८ रुपये दराने खरेदी करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीतील दूध खरेदीला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे. त्यापोटी १६५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन महिन्यांत शासनाच्या निकषानुसार ६ लाख ३०३ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३३ कोटी लिटर गाय दूध अनुदानासाठी पात्र ठरले आहे.

या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळवण्यात पुणे विभाग आघाडीवर राहिला असून, त्यापाठोपाठ नाशिक विभाग आहे. मिळणार असून, त्यापैकी आतापर्यंत १८ कोटी १८ लाख १७ हजार ५ लिटर दुधाचे ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उर्वरित अनुदान येत्या चार ते पाच दिवसात मिळणार असल्याची माहिती राज्याचे आयुक्त मोहोड यांनी माहिती दिली.

विभागनिहाय अनुदान असे मिळणार

पुणे - ९५ कोटी, नाशिक - ६२ कोटी, औरंगाबाद - ८ कोटी, अमरावती १ लाख ३० हजार, कोकण ७ हजार, नागपूर - ४७ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT