Ajit Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Budget Farmer Scheme : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा; कृत्रिम बुद्धिमत्ता, शेतरस्ते व पाणंद, पोकरासाठी तरतूद

Maharashtra Budget 2025 : यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा, यासाठी सरकारनं निर्णय घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती वापर केल्याने सुरुवातीला ५० हजार शेतकऱ्यांना फायदा होईल.

Dhananjay Sanap

: राज्यातील शेती क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी पुढील दोन वर्षासाठी ५०० कोटींची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी २०२५-२६ अर्थसंकल्प विधिमंडळात सोमवारी (ता.१०) सादर केला. पोकरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने ३५१ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित असल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी पुन्हा संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार अजित पवारांनी मानले, तसेच लोकहिताचे निर्णय राबवण्याची ग्वाही दिली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा, यासाठी सरकारनं निर्णय घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती वापर केल्याने सुरुवातीला ५० हजार शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांना पीक सल्ला देणं, पीक नियोजन, उत्पादकता वाढवणे खर्च कमी करणे, दर्जेदार शेतमाल उत्पादन आणि शेतमाला हक्काची बाजार पेठ देणं यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील उपयुक्त कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्या १ लाख एकरला फायदा होईल, असंही अजित पवार म्हणाले

राज्यातील शेतकऱ्यांना ७.५ एचपी कृषी पंपाना मोफत देऊन ४७ लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत असल्याचं पवार म्हणाले. तसेच नैसर्गिक शेतीसाठी २५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्तरावर हवामान केंद्र उभारण्याची घोषणा अजित पवारांनी केली.

तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी ६.४५ घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतुद करण्याची घोषणा अजित पवारांनी केली. कृषी विभागासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण ९ हजार ७१० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये विविध योजनांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ashtamudi Lake: एका कवितेची सत्तरी

Citrus Crop Disease: लिंबूवर्गीय पिकांवरील ‘लीफ मायनर’

Soybean Market: सोयाबीन बाजाराची चाल कशी असेल?

Weekly Weather: तापमानात घसरण सुरू; थंडीची चाहूल

Agriculture Department :कृषी विभागाने बदलले बोधचिन्हासह घोषवाक्य

SCROLL FOR NEXT