Maharashtra Election Results 2024 agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Maharashtra Election : सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर कऱ्हाड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शनिवार(ता.२३) सकाळी ८ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली. पोस्टल मतमोजणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून पहिला कल हाती आला आहे.

कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, कागलमधून समरजीत घाटगे, राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी आघाडी घेतली आहे. याचबरोबर इचलकरंजी मतदारसंघातील राहुल आवाडे यांनी आघाडी घेतली आहे.

याचबरोबर सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर कऱ्हाड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे. पाटणमधून पोस्टल मतदानात शंभुराज देसाई आघाडीवर आहेत तर सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रसिंह राजे यांनी पोस्टल मतदानात आघाडी घेतली आहे.

पहिल्या ३० मिनीटात पोस्टल मतदानात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे तर महाविकास आघाडी पिछाडीवर आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना रोखण्यात शेकापचे देशमुख यांनी यश मिळवलं आहे.

कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर आघाडीवर

पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना 4472 मते

तर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना 7014 इतकी मते

राजेश लाटकर 2542 मताने आघाडीवर

कसबा बावडा येथील पहिली फेरी पडली पार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT