Mahad Wildlife Project Agrowon
ॲग्रो विशेष

Crocodile Conservation : महाडमध्ये मगर संवर्धन प्रकल्प

Mahad Wildlife Project : सावित्री नदीपात्रालगत तसेच अनेक पाणतलावांमधून मगरींचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येतो. महाडमधील सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमावर मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात.

Team Agrowon

Raigad News : मगरीचे निसर्गातील महत्त्व लक्षात घेऊन मगर संवर्धनाचा प्रकल्प दूरगामी स्वरूपात करण्याकरिता व हे काम प्रभावीपणे समाजाभिमुख करण्याची गरज ओळखून महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही आणि प्रीजीव स्पेशल लिस्ट कंपनी समूह तसेच रोहा वन विभाग आणि सिस्केप संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मगर संवर्धन प्रकल्प महाड येथे सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाचा शुभारंभ जागतिक मगर दिवसाचे औचित्य साधून १८ जूनला करण्यात आला.

सावित्री नदीपात्रालगत तसेच अनेक पाणतलावांमधून मगरींचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसून येतो. महाडमधील सावित्री आणि गांधारी नदीच्या संगमावर मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात. या मगरींना मार्श क्रोकोडाइल या नावाने संबोधतात. या मगरी माणसावर हल्ला करीत नाहीत. तसेच इतर पाळीव प्राण्यांनाही इजा पोहोचवत नाहीत. गेल्या २८ वर्षांत मगरींचे संवर्धन व्हावे, याकरिता महाडची सिस्केप संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

मगर संवर्धन प्रकल्पाचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले असून या वेळी रोहा उपवनसंरक्षक शैलेंद्र कुमार जाधव, महाड वनक्षेत्रपाल आशीष पाटील, कंपनीचे वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक विनोद देशमुख, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विवेक म्हात्रे, कंपनीचे उच्च अधिकारी सलीम सिरखोत, नवीन एस. आर. व बालाजी वेंकटरामन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विनोद देशमुख यांनी, कंपनीचे अध्यक्ष महेश बबानी यांची पर्यावरणीय विकास संकल्पना स्पष्ट केली.

या वेळी कंपनीने केलेल्या मियावाकी जंगल निर्मिती, वृक्षारोपण, महाड शहर परिसरातील गावांमधून करीत असलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. मगरीबद्दल नागरिकांमध्ये असलेली भीती, गैरसमज दूर करून त्याचे संवर्धन करण्यासाठी कंपनी सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विवेक म्हात्रे यांनी मगर बचाव आणि त्‍यासाठी लागणारी सामग्री याविषयी सुरक्षा पथक तयार करण्याचे आवाहन सिस्केप संस्थेस केले. सिस्केप संस्थेस सहकार्य करण्यासाठी मगर संवर्धन प्रकल्प उभारण्यात वनविभाग विविध विषयांवर प्रत्यक्ष सहकार्य करेल, असे आश्वासन उपवनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव यांनी दिले. चित्रफीत आणि दृकश्राव्य माध्यमातून सिस्केप संस्थेचे अध्यक्ष, वन्यजीव रक्षक प्रेमसागर मेस्त्री यांनी उपस्थितांना मगर संवर्धन प्रकल्प संकल्पना स्पष्ट केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT