Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Waive Scheme : ‘महाआयटी’ने मागितली कर्जाच्या ‘डाटा’साठी मुदत

Maha IT : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना महाऑनलाईनने पोर्टलद्वारे राबविली होती.

Team Agrowon

Mumbai News : भाजप सरकारच्या काळात २०१७ मध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ज्या सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, त्यांचा डाटा पुनर्स्थापित करण्यासाठी ‘महाआयटी’ने एक आठवड्याची मुदत सहकार विभागाकडे मागितली आहे. तत्कालीन महाऑनलाईनच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन हा तांत्रिक घोळ मिटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना महाऑनलाईनने पोर्टलद्वारे राबविली होती. या पोर्टलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा संकलित केला होता. दरम्यान, २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली.

या योजनेची कार्यवाही ‘महाआयटी’ने केली. त्यामुळे ‘महाऑनलाईन’ने सुरू केलेले पोर्टल बंद करण्यात आले. मात्र २०१७ च्या योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखांवरील शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतही लाभ मिळू शकला नाही.

यामध्ये १६४४ कोटी रुपयांची कर्जमाफी तर ३९८५ कोटी रुपयांची एकरकमी परतफेड योजना आणि ३४६ कोटी रुपये प्रोत्साहन लाभापोटी देणे बाकी आहेत. ही रक्कम ५९७५ कोटी रुपयांची असून त्यासाठी शेतकऱ्यांची माहितीच मिळत नसल्याने अधिकारीही हैराण आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ‘महाआयटी’च्या अधिकाऱ्यांसोबत सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Cotton Import: कापूस आयातीवरील शुल्क हटवले

Amitabh Pawade Death: अमिताभ पावडे यांचे अपघाती निधन

MahaDBT Portal: महाडीबीटीमधील गोंधळामुळे फलोत्पादन संचालकही हैराण

Maharashtra Heavy Rain: पीक नुकसानीसह चिंताही वाढली

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार

SCROLL FOR NEXT