Fodder Management Agrowon
ॲग्रो विशेष

Luncern Fodder : प्रथिने, जिवनसत्वांचा उत्तम स्त्रोत लसूण घास

Lasun ghas : द्विदल चारा पिकामध्ये सर्वात जास्त प्रथिने असलेला चारा म्हणजे लसूण घास. एक वर्षापासून ते तीन वर्षापर्यंत या चारा पिकाची सतत कापणी करता येते. हे गवत मेथीच्या भाजी सारखं दिसत असल्यामुळे त्याला मेथी घास असही म्हणतात.

Team Agrowon

Fodder Management : द्विदल चारा पिकामध्ये सर्वात जास्त प्रथिने असलेला चारा म्हणजे लसूण घास. एक वर्षापासून ते तीन वर्षापर्यंत या चारा पिकाची सतत कापणी करता येते. हे गवत मेथीच्या भाजी सारखं दिसत असल्यामुळे त्याला मेथी घास असही म्हणतात. याशिवाय काही ठिकाणी ल्यूसर्ण घास असही म्हणतात. या चारा पिकात १८ ते २२ टक्क्यांपर्यंत प्रथिने असतात. आपल्या कडे किती जनावरे आहेत त्यानूसार दोन गुंठ्यापासून ते २ एकरांपर्यंत लसूण घासाची लागवड करता येते.

लसूण घास या चारा पिकात जीवनसत्त्व अ आणि ड, प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षभर भरपूर, सकस हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळत राहतं. लसूण घास हे ६० ते ९० सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढते. लसूण घास हे पीक काळ्या कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, मध्यम प्रतीच्या पोयटायुक्त जमिनीत घेता येतं. या चारा पिकाला थंड हवामान पोषक असतं. त्यामुळे लागवड ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. तसच उष्ण आणि कोरड्या हवामानातसुद्धा हे पीक वाढू शकतं. आम्लयुक्त जमिनीत उत्पादन कमी येतं, कारण अशा जमिनीत बियांची उगवण एकसारखी न होता सुरवातीला नांग्या पडतात. त्यामुळे कालांतराने एकूण झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते.

किमान तीन वर्ष हे पीक जमिनीत ठेवता येतं. हे लक्षात घेऊन एक खोल नांगरट करून जमिनीची चांगली मशागत करावी. जास्त पावसाच्या प्रदेशात आणि काळ्या कसदार जमिनीत वरंबे प्रमाणापेक्षा जास्त उंच ठेवू नयेत. कारण वाफ्यामध्ये पाणी साचून राहते. घासाच्या रोपांची मर होऊन पीक विरळ होते. मध्यम ते कमी पावसाच्या प्रदेशात वाफे करताना वरंबे नेहमीपेक्षा थोडे रुंद व उंच ठेवावेत.

दोन ओळीत ३० सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणं सोपं जातं. पण बहुतेक शेतकरी लसूण घासाची पेरणी बी फोकून करतात. त्यामुळे बियाणे जास्त लागते, उगवण एकसारखी होत नाही. पुढे आंतरमशागतीलाही अडचण होते. त्यामुळे पेरणी ओळीमध्येच करावी.

लागवडीसाठी प्रति हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील चारा पिके संशोधन प्रकल्पाने आर. एल. ८८ या जातीची शिफारस राज्य व राष्ट्रीय स्तरावर केली आहे. ही जात बहुवर्षीय उत्पादन देणारी आहे. याशिवाय आनंद-२, आनंद-३, को-१ या ही काही लसुण घासाच्या सुधारित जाती आहेत. जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. जास्त प्रमाणात पाणी दिल्यास रोपे मरण्याची शक्यता असते.

पेरणीनंतर पहिली कापणी ५० ते ५५ दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून ५ ते ६ सेंटीमीटर उंचीवर करावी. कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. पहिल्या वर्षी १० ते ११ कापण्या तर दुसऱ्या वर्षी १२ ते १४ कापण्या होतात. तिसऱ्या वर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत हिरव्या चाऱ्यासाठी कापण्या घ्याव्यात. वर्षभरात लसूण घासापासून १२० ते १४० टन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन मिळते.त्यामुळे तुमच्याकडे जर जनावरे असतील तर घरच्या शेतातीतल थोडी जागा लसूण घास लागवडीसाठी नक्की राखून ठेवा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT