Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Wheat Sowing : खानदेशात रब्बीची गहू पेरणी अल्पच

Rabi Season : खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची अद्यापही कमी किंवा अल्प दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची अद्यापही कमी किंवा अल्प दिसत आहे. सुमारे २० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यात कोरडवाहू दादर ज्वारी व कोरडवाहू हरभरा पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

गहू पेरणी सुरू आहे. परंतु काही किंवा मोजके शेतकरीच गव्हाची पेरणी करीत आहेत. मका लागवड, काबुली हरभरा पेरणी अपवाद वगळता सुरू झालेली नाही. यामुळे पेरणीखालील क्षेत्र सध्या कमीच दिसत आहे.

ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र सोयाबीन, उडीद, मूग, मका ही पिके घेऊन रिकामे झाले, त्यांनी पेरणी केली आहे. यात तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीच्या क्षेत्रातील काळ्या कसदार जमिनीत दादर ज्वारी, कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे.

ही पेरणी मागील २० ते २२ दिवसांपासून सुरू होती. ओलावा नाहीसा होईल, या भितीने अनेकांनी सोयाबीन, उडीद, मूग, मक्याखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पूर्वमशागत लागलीच पूर्ण केली व त्यात पेरणी उरकून घेतली आहे.

पेरणी अनेक भागात यशस्वी झाली आहे. खानदेशात कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारी यांची पेरणी इतर पिकांपेक्षा अधिक दिसत आहे. ही पेरणी सुमारे ५० हजार हेक्टरवर आहे. खानदेशात एकूण पावणेचार ते चार लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. मागील तीन वर्षे पेरणी चार लाख हेक्टरपेक्षा अधिक झाली आहे. जळगावातील पेरणी १४० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याची नोंदही आहे.

परंतु यंदा पाऊसमान कमी राहीले. परतीचा पाऊसही नसल्याने पेरणी हवी तेवढी झालेली नाही, असेही चित्र आहे. अनेकांनी ओलावा नसल्याने पेरणी टाळली. कांदा लागवडीवरही कमी पावसाने परिणाम झाला आहे.

रब्बीची पेरणी खानदेशात यावल, रावेर, चोपडा, जळगाव,अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात बऱ्या स्थितीत आहे. इतर भागातील पेरणीबाबत समाधानकारक स्थिती नाही. कारण मुरमाड, हलक्या जमिनीत पेरणी धोक्याची होती. तसेच अनेक भागात पाऊसमान कमी राहिल्याने पेरणी कमी झाली आहे.

कापूस पीक काढून क्षेत्र रिकामे करण्याची कार्यवाही संथ

रब्बी पिकांत सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची केली जाते. त्यात खानदेशात काबुली हरभऱ्याची पेरणीदेखील ११ ते १२ हजार हेक्टरवर असते. ही पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. हरभऱ्याची पेरणी सुरू आहे.

परंतु अनेक शेतकरी कापूस पीक काढून रिकाम्या झालेल्या क्षेत्रात हरभरा, गहू, मक्याची पेरणी करतील. कापूस पीक काढून क्षेत्र रिकामे करण्याचे काम अल्प शेतकरी करीत आहेत. ही कार्यवाही दिवाळीनंतर गती घेईल. यामुळे रब्बीची पेरणी दिवाळीनंतर अधिकची दिसेल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT