Oilseed Agrowon
ॲग्रो विशेष

Oilseed Sowing : करमाळा तालुक्यात तेलबियांची अत्यल्प पेरणी

Oily Crop Sowing : सूर्यफूल, तीळ, जवस, करडई या तेलवर्गीय पिकांची पेरणी अत्यल्प झाली आहे. त्यातच गतवर्षी पावसाने मोठा फटका दिल्याने यंदा रब्बी हंगामात तेलवर्गीय पिके अल्प प्रमाणात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Team Agrowon

Solapur News : गेल्या काही वर्षात करमाळा तालुक्याच्या जिराईत भागातील पारंपरिक तेलबिया क्षेत्रावर वरचेवर घट होत असल्याचे दिसून येत आहे. सूर्यफूल, तीळ, जवस, करडई या तेलवर्गीय पिकांची पेरणी अत्यल्प झाली आहे. त्यातच गतवर्षी पावसाने मोठा फटका दिल्याने यंदा रब्बी हंगामात तेलवर्गीय पिके अल्प प्रमाणात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेले काही वर्षापासून पारंपरिक पिके नष्ट होऊन त्या जागी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे घरगुती वापरामध्ये शेंगदाणा, करडई, तीळ, सूर्यफूल आदी तेलाचा वापर हळूहळू कमी कमी होत आहे. गेल्या काही वर्षात सोयाबीनचा प्रचंड प्रमाणात प्रसार व प्रचार करण्यात येत असल्याने शेतकरी आता करडई, सूर्यफूल, भुईमूग लागवड करणे टाळू लागले आहेत.

भाजीपाला व फळबागांचे क्षेत्र

करमाळा भाजीपाल्याचे सरासरी क्षेत्र ५३३२ हेक्टर आहे. यामध्ये कांदा चार हजार ४६७ हेक्टर, टोमॅटो १७६ हेक्टर

क्षेत्र आहे. तर फळबागांचे सरासरी क्षेत्र तीन हजार ५२८ हेक्टर आहे. यामध्ये केळीचे सरासरी क्षेत्र तीन हजार ५७ हेक्टर आहे.

रब्बी पेरणीचे क्षेत्र

तीळ : ००

जवस ; ००

सूर्यफूल : ००

करडई : २२ हेक्टर

ज्वारी : ३५ हजार २९० हेक्टर

मका : दोन हजार ३४२ हेक्टर

गहू : एक हजार ७१६ हेक्टर

प्रतेलबिया पेरणीकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही पिके काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पावसाने मोठा फटका दिल्याने शेतकऱ्यांचे पेरणीचे गणित बिघडून गेले आहे.
देवराव चव्हाण, कृषी अधिकारी, करमाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT