Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone Scheme : ड्रोन तंत्रज्ञान योजनेस कमी प्रतिसाद

Drone Technology Subsidy : जिल्हाभरातून 100 अर्जदेखील सादर झालेले नाहीत. ड्रोनद्वारे फवारणीबाबत ठोस शिफारशी नाहीत. तसेच हे तंत्रज्ञान मोठे उपयोगाचे ठरल्याचेही जिल्ह्यात प्रयोग झालेले नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : खतांचा वापर कमी करण्यासह मजूरटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि युरिया, डीएपी व इतर खतांच्या नॅनो खतांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्याचे जाहीर केले असून, त्याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

या योजनेतून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागासह लोकप्रतिनिधींनी मागील वर्षभरात अनेकदा केले. परंतु या योजनेस अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

जिल्हाभरातून 100 अर्जदेखील सादर झालेले नाहीत. ड्रोनद्वारे फवारणीबाबत ठोस शिफारशी नाहीत. तसेच हे तंत्रज्ञान मोठे उपयोगाचे ठरल्याचेही जिल्ह्यात प्रयोग झालेले नाहीत. ऊस पिकात नंदुरबारात फवारणीचे प्रयोग झाले. त्यासही प्रतिसाद ऊस उत्पादकांनी दिलेला नाही.

ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापना करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, ग्रामीण नव उद्योजक, कृषी पदवीधर, असलेले अवजारे बँक (सेवा सुविधा केंद्र) हे पात्र आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, ग्रामीण नव उद्योजक यांना ४० टक्के किंवा कमाल चार लाख रुपये अनुदान देय असणार आहे.

कृषी पदवीधर यांना अपग्रेडिंग कस्टम हायरिंग सेंटर करिता ५० टक्के किंवा कमाल पाच लाख रुपये अनुदान देय आहे.जळगाव जिल्ह्यात १४५ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झालेली असून सुमारे ७० शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन जिल्ह्यात महा एफपीसी हे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन देखील स्थापन केले आहे. परंतु शेतकरी समूह, अवजार बँकांकडून अर्ज आलेले नसल्याची माहिती मिळाली.

पुन्हा एकदा आवाहन

ड्रोन अनुदान योजनेसंबंधी आधार कार्ड, अधिकृत ड्रोन विक्रेत्याचे कोटेशन, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे प्राधिकृत पत्र, अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT