Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पूर्वमोसमीचा तीळ पिकाला तडाखा

Pre-Monsoon Rain : गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसासह गारपिटीमुळे तीळ पिकाला फटका बसत आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या तीळ पिकाचे अतोनात नुकसान होत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha News : गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसासह गारपिटीमुळे तीळ पिकाला फटका बसत आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या तीळ पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप, रब्बी हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळी तीळ पिकाची लागवड केली. याआधीही पूर्वमोसमी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यातून वाचून अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने पिकवलेले तीळ पीक पूर्वमोसमी पावसामुळे ओलेचिंब होत आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी पिकाची सोंगणी करून ढीग लावले आहे. तर काही शेतकरी तीळ पिकाची सोंगणी करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसासह गारपिटीमुळे तीळ पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी तीळ पिकांची लागवड करतात. या पिकांतून कमी कालावधीत चांगली मिळकत होते. त्यामुळे उन्हाळी पीक शेतकरी घेतात. इतर पिकांच्या तुलनेत तिळाच्या उत्पादनात एकरी उत्पन्न कमी मिळते.

मात्र पूर्वमोसमी पावसामुळे या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. सोंगणीवर आलेले तीळ पीक पावसामुळे जमीनदोस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पूर्वमोसमी पावसामुळे तीळ उत्पादनावर मोठा प्रमाणात होत आहे.

संकट पिच्छा सोडेना

सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर रोगराई आणि पूर्वमोसमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.

उन्हाळी पिकातून झालेले नुकसान भरून निघेल, या आशेने तिळाची लागवड केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसासह गारपिटीमुळे तीळ पिकाचे अतोनात नुकसान होते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

या वर्षी सोयाबीन, कपाशी व तूर या पिकांतून पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नाही. यातून लागवड केलेला खर्चही निघाला नाही. उन्हाळी पीक म्हणून तीळ पिकांची लागवड केली. मात्र सुरुवातीला रोगराई आल्याने फवारणी करावी लागली. त्यात आता पूर्वमोसमी पाऊस, गारपिटीमुळे तीळ पिकाचे नुकसान होत आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
-किरण मिटकर, शेतकरी, खरांगणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT