vinay kore agrowon
ॲग्रो विशेष

Warna Doodh Sangh : वारणा दूध संघाला स्थानिक संस्था ऑनलाइनद्वारे जोडणार

Dr. Vinay Kore : ‘गावातील दूध संस्थेतील वजन काटा, फॅट व युको मशिन व दूध उत्पादक ऑनलाइनद्वारे वारणा दूध संघाशी थेट जोडण्याचे सॉफ्टवेअर निर्माण केले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ‘गावातील दूध संस्थेतील वजन काटा, फॅट व युको मशिन व दूध उत्पादक ऑनलाइनद्वारे वारणा दूध संघाशी थेट जोडण्याचे सॉफ्टवेअर निर्माण केले आहे. यामुळे सर्वच संस्थांत एकसारखेपणा होऊन उत्पादकांना रोज मोबाइलवर माहिती उपलब्ध होणार आहे.

तसेच प्रत्येक दूध उत्पादकाला सभासदांप्रमाणे दुग्ध पदार्थ देण्याचा विचार असल्याचेही वारणा दूध संघाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी सांगितले. वारणा दूध संघ नोंदणीकृत सहकारी संस्थांचा मेळावा व ऑनलाइन कार्यप्रणालीबाबत दूध संस्था प्रतिनिधींशी संवाद समारंभात डॉ. कोरे बोलत होते.

उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक शिवाजी कापरे, अभिजित पाटील, अरुण पाटील, माधव गुळवणी, प्रदीप देशमुख, महेंद्र शिंदे, के. आर. पाटील, दीपक पाटील, व्ही. टी. पाटील, राजवर्धन मोहिते, शिवाजी जगंम, चंद्रशेखर बुवा, शोभा पाटील, डॉ. मिलिंद हिरवे, मयूर पाटील, लालासाहेब पाटील उपस्थित होते.‌

डॉ. कोरे म्हणाले, की संघाच्या पशुधन कवच विमा योजनेस प्रतिसाद मिळत आहे. वारणा समूहातील ऊस व दूध उत्पादकांसाठी स्वतःची विमा कंपनी स्थापण्याचा मानस आहे.

कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी संघाच्या उपक्रमांची माहिती दिली. संचालक शिवाजीराव मोरे यांनी दूध संस्थांच्या अडचणी मांडल्या. दूध संकलन व्यवस्थापक अशोक पाटील यांनी स्वागत केले. शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT