Agriculture Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Loan : उसासाठी जिल्हा बँकेकडून ११५६ कोटींचे कर्जवाटप

PDCC Bank Loan Disbursement : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुणे जिल्ह्यातील ८७ हजार ६४७ सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत तब्बल ११५६ कोटी ६० लाख ७६ हजार रुपयांचे वाटप केले आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुणे जिल्ह्यातील ८७ हजार ६४७ सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत तब्बल ११५६ कोटी ६० लाख ७६ हजार रुपयांचे वाटप केले आहे. यंदा तब्बल ७४ हजार ४७ हेक्टरसाठी ऊस उत्पादकांना पीककर्जाचे वाटप केले असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात सर्वाधिक पीक उसाचे आहे. प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर हे तालुके उसासाठी प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यात सुमारे एक ते दीड लाख हेक्टरवर उसाची लागवड होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकांसाठी कर्ज घेऊन लागवडीचे नियोजन करतात.

प्रामुख्याने खरिपात आडसाली, पूर्वहंगामी आणि रब्बी हंगामात सुरू उसाची लागवड शेतकरी करतात. याच कालावधीत खरीप पिकांचे नियोजन करत असल्यामुळे अनेक शेतकरी बँकेकडून पीककर्ज घेतात. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सर्वाधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यातील खरीप, रब्बी हंगामांतील पिकांसाठी जिल्हा बँकेने एकूण दोन हजार ७४२ कोटी १ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी सर्वाधिक पीक कर्जाचे हे ऊस उत्पादकांना करण्यात आले आहे. पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी कर्जपुरवठा करून तो कर्जरुपाने सभासदांना देतात.

सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत. त्यामुळे खरीप, रब्बीसाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा बँकेने ८२ हजार ९२८ ऊस उत्पादकांना ७० हजार २०७ हेक्टरसाठी १०९३ कोटी ६४ लाख ९ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. तर रब्बी हंगामात ४ हजार ७१९ ऊस उत्पादकांना ३ हजार ८४० हेक्टरसाठी ६२ कोटी ९६ लाख ६८ हजार रुपयांचे पीकवाटप केले आहे.

जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उसासाठी पीककर्ज घेतात. जुन्नर, आंबेगाव, दौंड, इंदापूर, बारामती आणि शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचा फायदा अनेक शेतकरी घेतात.
डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पीडीसीसी बॅंक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

Agribusiness Exhibition: मुंबईत आंतरराष्ट्रीय कृषी व्यवसाय प्रदर्शन

Farmer Empowerment Bill: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधान परिषदेत मंजूर

Poor Quality Soybean Seeds: निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे विदर्भातील शेतकरी संकटात

Forest Right Land: वनहक्क जमिनींना स्वतंत्र सातबारा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

SCROLL FOR NEXT