Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Census : तांत्रिक अडचणींमुळे पशुगणना लांबणीवर

Animal Care : दर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप कामच करीत नसल्याने मोहीम सुरू होण्याआधीच थांबविण्यात आली आहे.

Team Agrowon

Chandrapur News : दर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप कामच करीत नसल्याने मोहीम सुरू होण्याआधीच थांबविण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून राज्यभरात पशुगणनेचे काम सुरू होणार होते. मात्र, वीस दिवसांनंतरही पशुगणनेला सुरुवात होऊ शकलेली नाही.

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दर पाच वर्षांनी पशुगणना होते. एक सप्टेंबरपासून राज्यभरात पशुगणनेचे काम सुरू होणार होते. २०१९ रोजी करण्यात आलेली पशुगणना टॅबच्या मदतीने करण्यात आली होती. आता त्यापुढे एक पाऊल विभागाने टाकले आहे. २१ व्या पशुगणनेसाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.

या डिजिटल पद्धतीचा वापर करून पशुगणना करण्यात येणार आहे. पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या अॅपद्वारे ऑगस्टमध्ये प्रयोगिक तत्त्वावर काही ठिकाणी पशुगणना करण्यात आली होती. त्यादरम्यान नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आली. याचदरम्यान पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेले अॅप कामच करीत नसल्याचे समोर आले.

विकसित करण्यात आलेले अॅप रिफ्रेश होत नसल्याने एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पशुगणनेचे काम लांबणीवर पडले आहे. येत्या काही दिवसांत अॅपचा बिघाड दुरुस्त होऊन पशुगणनेला सुरुवात होईल, अशी आशा पशुसंवर्धनला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप पशुगणनेबाबत सूचना मिळाल्या नसल्यामुळे सध्यातरी पशुगणना लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात ७ लाख ५२ हजार २८६ जनावरे

२०१९ रोजी जिल्ह्यात पशुगणना करण्यात आली. या गणनेनुसार जिल्ह्यात ७ लाख ५२ हजार २८६ जनावरांची नोंद झाली होती. त्यात गायवर्गीय जनावरे ३ लाख ९५ हजार ९१६, म्हैसवर्गीय जनावरे ६४ हजार ३८, शेळ्या २ लाख ४० हजार २८०, डुकरे १५५६ आणि घोडे १३ आहेत. हा आकडा पुन्हा वाढणार आहे. विशेष म्हणजे यंदा मोकाट जनावरांची गणना केली जाणार आहे. गौरक्षणातील जनावरे, भटकंती करणाऱ्या समाजाकडील पशुंची गणना केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT