Bogus Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Fertilizers : बोगस खत विकणाऱ्यांचे परवाने रद्द करणार

Cancellation of Licenses : बोगस डीएपी व संयुक्त खतांची विक्री करणाऱ्या आठ विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागाने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

Team Agrowon

Amaravati News : बोगस डीएपी व संयुक्त खतांची विक्री करणाऱ्या आठ विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागाने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात या विक्रेत्यांची सुनावणी मंगळवारी (ता. ६) पार पडली.

या विक्रेत्यांविरुद्ध लवकरच परवाने रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली.

पुणे येथील खत निर्माता कंपनीने जिल्ह्यात २० जूनपर्यंत २१०० बॅग १०ः२६ः २६ व ३३०० बॅग डीएपीची विक्री केल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या खतांचे प्रयोगशाळेत केलेल्या विश्लेषणात त्यामध्ये आवश्यक घटक नसल्याचे व ते मातीसदृश असल्याचे उघडकीस आले होते.

या खतांची जिल्ह्यात कुठे कुठे व कोणत्या विक्रेत्यांमार्फत विक्री झाली याचा तपास घेतला असता काही नावे समोर आलीत. त्या विक्रेत्यांना कृषी विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. त्यांची सुनावणी मंगळवारी घेण्यात आली. या सुनावणीत विक्रेत्यांचे स्पष्टीकरण घेण्यात आले.

विक्रेत्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. या विक्रेत्यांचे खतविक्रीचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT