Sugarcane Worker Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Worker : ऊसतोड कामगारांना शासकीय सुविधांचा लाभ मिळवून द्या

सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व अभियान या उपक्रमाअंतर्गत सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक घेतली.

Team Agrowon

Parnhami News : ऊसतोड कामगार हे अल्प कालावधीसाठी स्थलांतर करतात, अशावेळी त्यांना ऊसतोड कामगार (Sugarcane Worker) म्हणून ओळखपत्र देणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे, स्वस्त धान्य दुकानांतून (रेशन पोर्टबिलीटी) धान्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल (Collector Anchal Goyal) यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व अभियान या उपक्रमाअंतर्गत सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक घेतली.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, समाज कल्याण उपायुक्तगिता गुठ्ठे, पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

गोयल म्हणाल्या, की सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांची प्रमाणित यादी तत्काळ समाजकल्याण विभागाला उपलब्ध करून द्यावी व या यादीप्रमाणे सतत तीन वर्षांपेक्षा जास्त ऊसतोडीचे काम करणाऱ्या कामगारांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी एक महिन्यात ग्रामसेवकांमार्फत ओळखपत्रे द्यावीत.

सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी व्हावी. यासाठी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रमाणीत यादी लावून राहिलेल्या कामगारांनी त्वरित नोंदणी करून घ्यावी.

ऊसतोड कामगारांच्या नोंदणीचे काम ग्रामसेवकांनी १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यांना महिनाभरात (१५ जून) ओळखपत्र वितरीत करावेत. आरोग्य विभागामार्फत तालुकानिहाय शिबिरातून ऊसतोड कामगार, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांची प्राधान्याने तपासणी करावी.

जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना वेळेवर वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध होईल, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश दिले. कोणत्याही साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये ऊसतोडीसाठी बालमजूर आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश गोयल यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT