Leopard Terror Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : माढा तालुक्यातील सापटणे, भोसे भागात बिबट्याचा वावर

Leopard Attack : वनविभागाने पायाच्या ठशांवरून बिबट्या सदृश प्राणी असल्याबाबत दुजोरा दिला आहे.

Team Agrowon

Solapur News : माढा तालुक्यातील सापटणे, भोसे भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला असल्याचे तेथील लोकांकडून सांगण्यात येत आहे. वनविभागाने पायाच्या ठशांवरून बिबट्या सदृश प्राणी असल्याबाबत दुजोरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागही दक्ष झाला आहे.

बिबट्या सदृश प्राण्याने रात्रीच्या सुमारास सरडे वस्ती वरील दोन शेळीवर हल्ला करुण एक शेळी ओढून नेली. त्यापूर्वी बारलोणी (ता. माढा) येथील पाटील वस्ती या ठिकाणी सचिन पाटील यांच्या म्हशीचे रेडकूवर अज्ञात प्राण्याने हल्ला केला होता. मात्र सापटणे (भो) येथे वनसेवक नितीन यादव यांनी पाहणी केली.

बुधवारी वनपाल बाबासाहेब लटके यांनी सापटणे (भो) परिसराची पूर्ण पाहणी केली. त्या ठिकाणी ग्रामस्थांना भेटून शंकांचे निरसन केले. ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. बिबट्याचा वावर असलेल्या भागात घ्यावयाची काळजी- बिबट्या शक्यतो रात्रीच्या वेळी सक्रिय असतो.

रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकट्याने बाहेर पडणे टाळावे. पाळीव प्राण्यांना शक्यतो बंदिस्त व सुरक्षित जागी ठेवा. रात्री पायी फिरताना काठी अथवा टॉर्च जवळ बाळगा. अचानक बिबट्या समोर आल्यास शांत रहा. बिबट्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. वनविभागाला तत्काळ कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सापटणे( भो) या ठिकाणी आढळलेले पायाचे ठसे हे बिबट्या सदृश प्राण्याचे होते. बुधवारी मी स्वतः पाहणी केली असून त्या ठिकाणी बिबट्याची नविन हालचाल किंवा ठसे आढळून आले नाहीत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, वन विभागाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.
-बाबासाहेब लटके, वनपाल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT