Leopard Terror Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : गोदाकाच्या कायगाव परिसरात बिबट्याचा संचार वाढला

Leopard Update : भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे अन्न, पाणी आणि शिकारीच्या शोधात बिबट व इतर वन्य प्राण्यांचा गोदाकाच्या कायगाव परिसरात संचार वाढला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे अन्न, पाणी आणि शिकारीच्या शोधात बिबट व इतर वन्य प्राण्यांचा गोदाकाच्या कायगाव परिसरात संचार वाढला आहे.

रविवारी (ता. १२) भेंडाळा व अमळनेर भागातील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गणेशवाडी येथील रहिवासी असलेल्या गणेश अंबादास निरपळ यांची भेंडाळा शिवारात उसाची शेती आहे. त्यांच्या मक्याच्या पिकात बिबट्याच्या पायाचे ठसे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले.

तर दुसऱ्या घटनेत गणेशवाडीचे रहिवासी दिगंबर निरपळ यांच्या अमळनेर शिवारातील उसाच्या शेतातील शेडलगत बिबट्याचे रात्री सालगड्याला दर्शन झाले. या भागात बिबट्या आल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभागास सांगून बोलावून घेतले. सोमवारी (ता. १३) वनरक्षक एन. आर. चाथे हे घटनास्थळी येऊन त्यांनी बिबट्याच्या पायाच्या ठशांचा माग घेतला आणि शेतकऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले.

गावाजवळ बिबट दिसल्यास त्याला पाहण्यास गर्दी करू नये. त्याचे फोटो मोबाइलमध्ये काढू नयेत. त्याला त्रास देऊ नये. पहाटे व सायंकाळी अंधार पडल्यावर शेतात जाऊ नये, दक्षता घ्यावी.
एन. आर. चाथे, वनरक्षक वरझडी, ता. गंगापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT