Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

Leopard Attack : गेल्या दोन दिवसांपासून पिंपळनेर परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असून, गुरुवारी (ता. २१) पहाटे दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला.

Team Agrowon

Solapur News : गेल्या दोन दिवसांपासून पिंपळनेर परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावर असून, गुरुवारी (ता. २१) पहाटे दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला. मागील दीड वर्षाच्या कालावधीत या परिसरात होणारा हा चौथा हल्ला आहे.

या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाच्या वतीने नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून या परिसरात बिबट्यासदृश प्राण्याचा वावर वाढला असून, बुधवारी सकाळी साडेसात वाजता जय भवानवाडी येथे द्राक्ष बागेत फेरफटका मारताना नंदकुमार दत्तात्रय लोंढे यांना बागेतच दडून बसलेला बिबट्यासदृश प्राणी दिसला.

आरडाओरडा झाल्यानंतर तिथून तो पुढे उसाच्या शेतात गेल्याचे लोंढे यांनी पाहिले. गुरुवारी पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान शिराळ हद्दीतील वस्तीवरील सतीश हरिदास टोणपे यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला, त्यात त्या जागीच ठार झाल्या.

दरम्यान, वन विभागाच्या वतीने पिंपळनेर, शिराळ येथे बिबट्यासदृश प्राण्याचा वावर असणाऱ्या परिसरात प्राण्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले असून, वनपाल अबा लटके, वनरक्षक सायरा सय्यद, अनिल राठोड, नितीन यादव, तानाजी दळवी आदींनी घटनास्थळाची पाहणी करीत मार्गदर्शन केले.

सध्या परिसरात ऊस तोडणी सुरू झाली असून, आसरा मिळण्यासाठी बिबट्या उसाच्या क्षेत्रात राहतो परिसरात आढळलेले पावलांचे ठसे हे बिबट्यासदृश प्राण्यांचेच असल्याचे निदर्शनास आले असून, लोकेशन मिळण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. तातडीने पुढील उपाययोजना करण्यात येतील, नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी.
- आबासाहेब लटके, वनपाल, वनविभाग मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT