Lemon Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Lemon Rate : अकोल्यात लिंबाच्या दरात तेजी

सध्या बाजारात लिंबू सरासरी ५० रुपये किलोप्रमाणे विकत आहे. हंगामाच्या प्रारंभीच चांगला दर मिळत असल्याने पुढील काळात आणखी तेजी राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Akola News : उन्हाच्या झळा फेब्रुवारीतच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यंदा लिंबाला (Lemon) चांगला दर मिळेल हे संकेत बाजारात मिळू लागले.

सध्या बाजारात लिंबू सरासरी ५० रुपये किलोप्रमाणे विकत आहे. हंगामाच्या प्रारंभीच चांगला दर मिळत असल्याने पुढील काळात आणखी तेजी राहण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात (Summer) लिंबाला मोठी मागणी राहते. प्रामुख्याने एप्रिल-मे महिन्यात लिंबाला सर्वाधिक मागणी राहते. याच काळात दरही वाढलेले असतात. या सुरुवातीपासूनच दरांमध्ये तेजी सुरू झाली. सध्या बाजारात चांगल्या दर्जाच्या फळांना ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

दुय्यम दर्जाची फळेही २५ ते ३५ रुपयांदरम्यान प्रतिकिलो विकत आहेत. सध्या बाजारात मालाचा पुरवठा कमी असल्याने दर वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत.

लिंबू उत्पादक संतोष टाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दर चांगले असले तरी विक्रीसाठी माल नाही. यावर्षात सतत झालेल्या पावसामुळे लिंबू बागांमध्ये बहर उशिराने फुलला. आता लहान आकाराची व संख्येने कमी फळे आहेत.

ही फळे एप्रिल-मे मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतील. सध्या १५ किलो वजनाचे एक कट्टे ५०० ते ६०० रुपयांदरम्यान बाजारात विकले जात आहे. चांगल्या दर्जाच्या फळांना याहीपेक्षा अधिक भाव मिळत आहे.

आनंद ढोमणे म्हणाले, ‘‘बाजारात आवक कमी असल्याने व मागणी वाढल्याने दरांमध्ये तेजी आली आहे. मार्चमध्ये लिंबूचा हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यावर्षी लिंबू बागांमध्ये माल कमी आहे. सध्याचा माल परिपक्व होऊन बाजारात यायला अजून बरीच प्रतिक्षा करावी लागेल. त्यामुळे मार्च महिन्यात लिंबूची दरवाढ अधिक दिसत आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT