Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC: लिंबू फळ की भाजीपाला पणन संचालकांनी ठरवावे

Lemon Dispute: पुणे बाजार समितीतील लिंबू विक्रीवरून निर्माण झालेला वाद गडद होत असून, शेतकरी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना आता कुठेही लिंबू विक्री करण्यास मुभा मिळाली आहे. लिंबू फळ आहे की भाजीपाला, यावर अद्याप स्पष्टता नाही.

गणेश कोरे

Pune News: लिंबू हे फळ की भाजीपाला हे पणन संचालक ठरवत नाहीत, तो पर्यंत पुणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेही लिंबे विक्री करता येणार आहे. काही निवडक लिंबू आडत्यांच्या दबावाखाली आणि हितासाठी बाजार समितीने शेतकऱ्यांना भाजीपाला विभागात लिंबे विक्रीस मनाई केली होती.

दरम्यान, बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कोणत्या आडतीवर टाकायचा हा सर्वाधिकार शेतकऱ्यांचा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणत, काही निवडक आडत्यांच्या फायद्यासाठी लिंबाची विक्री फक्त लिंबाच्या आडत्यांकडेच करण्यात यावी, या बाजार समितीच्या मनमानीला शेतकरी संघटनेने लगाम लावला आहे. शेतकऱ्यांना आता कुठेही लिंबे विक्री करण्यात येणार आहे.

बाजार समितीने शेतकऱ्यांना फक्त लिंबू विभागातच लिंबे विक्रीची सक्ती केली होती. याबाबत शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पाटील यांनी शेतकऱ्यांसह सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना लिंबू विभागात केवळ चार पाच आडते आहेत.

ते लिंबाला कमी दर देतात, तर भाजीपाला विभागात लिंबाला चांगले दर मिळतात हे हिशोब पट्यांसह दाखविले. यावेळी पाटील म्हणाले, की बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कोणत्या आडतीवर टाकायचा हा सर्वाधिकार शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणत, आडत्यांचे हित जोपासत असाल तर हे चुकीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना लिंबे कुठेही विक्रीची मुभा असावी.

यावेळी सचिव डॉ. धोंडकर यांनी शासनाने जाहीर केलेल्या यादीत लिंबाचा समावेश फळांच्या वर्गवारीत करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात लिंबाची विक्री भाजीपाला विभागात न करता फळ विभागात करावी. असा नियम असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर लिंबू हे फळ नसून भाजीचाच प्रकार आहे.

त्यामुळे लिंबाचा समावेश भाज्यांच्या यादीत करण्यात यावा, अशी भूमिका रघुनाथ पाटील यांनी मांडली. यावर डॉ. धोंडकर यांनी लिंबाचा समावेश फळांच्या यादीत असल्यामुळे बाजार समिती स्तरावर त्यात बदल करता येणार नाही, तर शासन स्तरावर तशी मागणी करावी लागेल. याबाबत पणन संचालकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल, असे सांगितले.

दरम्यान पणन संचालकांकडून लिंबू फळ की भाजीपाला यावर मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना लिंबे कोणाकडेही विक्रीस मान्यता देण्यात येणार असल्याचे सचिव डॉ. धोंडकर यांनी स्पष्ट केले.

भाजीपाला विभागात कैरी, फणस, कच्ची केळीची विक्री

लिंबाच्या आडत्यांच्या दबावाखाली आणि त्यांच्या हितासाठी बाजार समिती लिंबे भाजीपाला विभागात विक्रीसाठी मनाई करत आहे. मात्र, भाजीपाला विभागात कैरी, फणस, कच्ची केळी यांची सर्रास विक्री होत आहे. याकडे बाजार समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करत आहे. बाजार समितीचा हा दुटप्पीपणा कोणाच्या हित जोपासण्यासाठी होतोय हा चर्चेचा विषय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT