Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : साताऱ्यात उसाच्या गाळपात निवडणुकीची धामधूम

Maharashtra Assembly Election : जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्याही वाढली असून, १८ कारखाने गाळप करणार आहेत. यामध्ये बहुतांशी कारखाने हे लोकप्रतिनिधींचे असून हे निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरत असतात.

Team Agrowon

Satara News : ऊस गळीत हंगाम आणि विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम राहणार आहे. त्यामुळे ऊस सभासद शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी कारखानदारांकडून यावेळेस या हंगामातील उसाला जादा दर तसेच गतवर्षीच्या हंगामातील दुसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

या शक्यतेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंड गोड होण्याबरोबरच कारखाना चालविणाऱ्या लोकप्रतिनिधींचे तोंड देखील मतांच्या बेगमीमुळे गोड होणार आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्याही वाढली असून, १८ कारखाने गाळप करणार आहेत. यामध्ये बहुतांशी कारखाने हे लोकप्रतिनिधींचे असून हे निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरत असतात. या लोकप्रतिनिधीची कारखान्याचे सभासद ही त्यांची व्होट बॅंक आहे.

यावेळेस विधानसभेची निवडणूक आणि गाळप हंगाम एकाचवेळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधींकडून जादा दर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंड गोड होण्याची आशा आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार नितीन पाटील, आमदार रामराजे नाईक- निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, प्रभाकर घार्गे आदी नेते साखर कारखान्यांशी संबंधित आहेत. त्या नेत्यांना विधानसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे व्होट बॅंक सांभाळण्यासाठी कारखान्यांच्या गाळपाच्या सुरवातीलाच चांगल्या दराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात यावर्षी सुमारे ८५ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. हा ऊस वेळेत जाण्यासाठी कारखान्यांना नियोजन करावे लागणार आहे. त्यातच विधानसभेची निवडणूक याच दरम्यान असल्याने शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी कारखानदारांकडून जादा दर देण्याबरोबर गत हंगामातील दुसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

काही कारखान्यांनी तर ऐन निवडणुकीत शेतकऱ्यांना जादा दर द्यावा लागण्याची शक्यता लक्षात घेऊन १५ नोव्हेंबरनंतरच गाळप परवाना द्यावेत, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT