Pradhan Mantri Food Processing Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Food Processing Scheme : नंदुरबारमध्ये मोबाईल व्हॅनचा प्रारंभ

प्रकल्प मंजुरीची संख्या कमी असणारे तसेच आकांक्षित जिल्हे म्हणजेच नंदुरबार, बीड, हिंगोली व परभणी या चार जिल्ह्यांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

Team Agrowon

PMFME Scheme : नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Food Processing Yojana) मोबाईल व्हॅनचा (Mobile Van) जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

हे वाहन १३ ते १७ फेब्रुवारी या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील १९ कृषी मंडळांमध्ये प्रत्येकी एक दिवस याप्रमाणे प्रचार प्रसिद्धी करणार आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत संपूर्ण देशभर सुरू असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेची जिल्ह्यामध्ये संथगतीने प्रगती सुरू असल्याने योजनेस व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी देण्यासाठी चार मोबाईल व्हॅन पुणे येथून पुरविण्यात आलेल्या आहेत.

प्रकल्प मंजुरीची संख्या कमी असणारे तसेच आकांक्षित जिल्हे म्हणजेच नंदुरबार, बीड, हिंगोली व परभणी या चार जिल्ह्यांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

मे. अँगल, ॲडव्हर्टायझिंग, पुणे या संस्थेस प्रचार व प्रसिद्धीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी चार मोबाईल व्हॅन पुणे येथून पाठविण्यात आल्या असून, त्यामध्ये ३० मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे.

यामध्ये लाभार्थी पात्रता निकष, तसेच जिल्ह्यामध्ये वाव असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय घडी पुस्तिकेचे वाटपही करण्यात येणार आहे.

मोबाईल वाहने १३ ते १७ फेब्रुवारी या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील १९ कृषी मंडळांमध्ये प्रत्येकी एक दिवस याप्रमाणे प्रचार प्रसिद्धी करणार आहेत.

यावेळी जिल्हा नोडल अधिकारी विजय मोहिते, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, जिल्हा संसाधन व्यक्ती विशाल घरटे, कृषी सहायक उत्सव पाटील व कृषी सहायक अक्षय वसावे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT