Shivendrasinhraje Bhosale  Agrowon
ॲग्रो विशेष

Latur DPDC : लातूर जिलह्यासाठी ‘डीपीडीसी’चा ४९० कोटींचा आराखडा

Latur District Development : जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार असून, यामाध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल.

Team Agrowon

Latur News : जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार असून, यामाध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल. जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेली, तसेच नव्याने सुरू होणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. तसेच जिल्हावासीयांसाठी अतिशय महत्त्वाचे असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री भोसले बोलत होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी ठाकूर यांनी प्रास्ताविकामध्ये सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या खर्चाची व सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित कामांची माहिती दिली. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्हा नियोजन समिती विविध योजनानिहाय खर्चाची, तसेच प्रस्तावित निधी, पुनर्विनियोजन प्रस्ताव याबाबत माहितीचे सादरीकरण केले.

कृषिपंपासाठी सुरळीत वीज पुरवठा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ग्रामीण भागातील विद्युत रोहित्रविषयक तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्यावे. विद्युत भार वाढल्यामुळे नादुरुस्त होणाऱ्या विद्युत रोहित्रांची यादी तयार करून त्यांची क्षमता वाढविणे, वीज वितरणचे सुरळीत होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री भोसले यांनी दिल्या.

जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. उपलब्ध करून दिलेल्या निधीतून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकोपयोगी कामे करून आपल्या जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी. या कामांमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा हयगय होणार नाही, याची दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे भोसले म्हणाले.

सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था, रस्ते विकास, आरोग्य व्यवस्था, जलजीवन मिशन, सिंचन प्रकल्प व तलाव, बंधारे यांची दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, प्रधानमंत्री पीक विमा योजना, जिल्हा रुग्णालय आदी विषय मांडले.

गाव तिथे स्मशानभूमीसाठी निधी देणार

प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी असावी, याकरिता ‘गाव तिथे स्मशानभूमी’ मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावांची यादी तयार करून स्मशानभूमी बांधकामाचा प्रस्ताव सादर करावा. या कामांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. यासोबत ज्या गावांमध्ये जमीन उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये भूसंपादनासह स्मशानभूमी बांधकामासाठी दुसऱ्या टप्प्यात निधी दिला जाईल.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधकामाचा आराखडा आणि प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री भोसले यांनी दिल्या. जिल्ह्यातील लातूर ते टेंभुर्णी महामार्ग रुंदीकरण आणि पानगाव ते लातूर रस्त्याच्या कामाचा प्रश्‍न, जलजीवन मिशनची अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करणे, तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, तलाव यांच्या दुरुस्तीच्या कामांबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याबाबत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी चर्चा झाली. त्यानुसार संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या असून लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT