Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Latur Mango Festival : हंगाम संपत आल्यानंतर लातुरात आंबा महोत्सव

Mango Season : आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने महोत्सवाला शेतकऱ्यांचा कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका आहे.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने २३ आणि २४ मे रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने महोत्सवाला शेतकऱ्यांचा कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका आहे. दरम्यान या महोत्सवात केसर, बादाम, हापूस, अल्फान्सो, पायरी, लंगडा, तोतापुरी आदी दर्जेदार आंब्यांची विक्री होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी दिली.

सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून पाच वर्षांत आंबा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी आंबा लागवडीतून शाश्‍वत उत्पादन घेण्यासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात अक्षय तृतीयापासूनच बाजारात आंबे विक्रीसाठी येतात.

शेतकरीही याच कालावधीत फळकाढणी होईल, या पद्धतीने आंबा फळबागांचे व्यवस्थापन करतात. सध्याची स्थिती लक्षात घेता ७५ टक्के आंब्याची काढणी होऊन विक्रीही झाली आहे. २५ टक्के आंबे राहिल्याची शक्यता आहे. काही शेतकरी कल्टरचा उपयोग करून उशिराने आंबा फळधारणेत येईल, याचे नियोजन करतात. अशाच शेतकऱ्यांकडे आंबा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पाऊस पडत असून आंब्याचा हंगाम संपत आल्याची चर्चा घडून येत आहे. या परिस्थितीत कृषी विभागाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महोत्सवाच्या आयोजनातून कृषी विभाग केवळ औपचारिकता पार पाडत असल्याचाही सूर काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सध्या आंबा विक्रीचा हंगाम जोरात सुरु असल्याचे सांगत पीक सीझनचा दावा केला. महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या जिल्हास्तरीय आंबा महोत्सवात आंबा विक्रीसाठी स्टॉल नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच दर्जेदार आंबा खरेदीसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार : जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT