Department Of Animal Husbandry  Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Cow Conservation : लातूर जिल्ह्यात देशी गोवंश संवर्धनासाठी आठ गोशाळांना एकतीस लाखांचे अनुदान

Desi Cow : लातूर जिल्ह्यात देशी गोवंश संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Team Agrowon

Latur News : लातूर : जिल्ह्यात देशी गोवंश संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण २१ नोंदणीकृत गोशाळांपैकी ८ पात्र गोशाळांची अनुदानासाठी निवड करण्यात आली असून, त्या गोशाळांमधील तीन वर्षांवरील देशी गाईंना प्रतिगाई प्रतिमहा दीड हजार रुपये दराने पोषणासाठी अनुदान जाहीर करण्यात आले.

यातूनच आठ गोशाळांना ३१ लाख ५४ हजार रुपयाचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाच्या समितीने सर्व पात्र गोशाळांची प्रत्यक्ष पडताळणी करून, पशू आधार टॅगिंगच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन ॲपवर गोवंशाची माहिती अपलोड केली आहे.

या उपक्रमात एक हजार ७०५ पशुधनामधून ७०१ देशी गाईंना तीन महिन्यांचे ३१ लाख ५४ हजार पाचशे रुपये इतके पोषण अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत थेट संबंधित गोशाळांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

यामुळे गोशाळा चालकांतून समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वीही श्री गोरक्षण संस्था, सोमनाथपूर (ता. उदगीर) यांना एक कोटी तर निकंठेश्वर गोशाळा, साखरा (ता. लातूर), रेणुका अंबा गोशाळा, हिंपळनेर (ता. चाकूर), श्री गणेश पर्सनल करिअर संचालित गोशाळा, रुद्दा (ता. अहमदपूर) यांना प्रत्येकी पंचेवीस लाख रुपये अनुदान मूलभूत सुविधा निर्मितीसाठी मंजूर करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT