Vidhansabha Election Result  Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Latur Dharashiv Election Update : विधानसभा निवडणुकीत शनिवारी (ता. २३) झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अनेक दिग्गज उमेदवारांना धक्का देत त्यांचा पराभवाच्या छायेत लोटले.

विकास गाढवे

Latur Dharashiv News : विधानसभा निवडणुकीत शनिवारी (ता. २३) झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अनेक दिग्गज उमेदवारांना धक्का देत त्यांचा पराभवाच्या छायेत लोटले. यातूनच लातूर जिल्ह्यातील सहापैकी सहा ठिकाणी तर धाराशिव जिल्ह्यात चारपैकी दोन ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या लातूर शहर मतदारसंघातील भाजपच्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूर व काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यात तर परांडा मतदारसंघात आरोग्यमंत्री शिवसेनेचे प्रा. डॉ. तानाजी सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शेवटच्या फेरीपर्यंत काट्याची टक्कर सुरू होती. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना मतदारांनी नाकारत भाजपचे आमदार रमेशअप्पा कराड यांना पसंती दिली.

लोकसभेत महाविकासआघाडीला मताधिक्क्य मिळाले होते. हेच मताधिक्क्य विधानसभा निवडणुकीत कायम राहील, यावर ठेवलेली भिस्त आघाडीला नडली असून लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघात मात्र, सत्ताधिकारी आमदारांचा थेट लोकांशी नसलेला संपर्काचा फटका बसल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सोयाबीनच्या हमीभावाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. मात्र, त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला नाही. जातीय समिकरणांसह स्थानिक मुद्द्यांनी कलाटणी दिली. काही उमेदवारांना प्रचारातील त्यांचा वाचाळपणाचाही फटका सहन करावा लागल्याचे चित्र दिसून होते. अहमदपूर मतदारसंघात सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे गणेश हाके यांनी आघाडी घेतली होती.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मोठी आघाडी घेऊन दुसऱ्यांदा विजयाचा मार्ग सुकर केला. क्रीडा व युवककल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर (अजा) मतदारसंघात थेट जनसंपर्क व विकास कामांच्या जोरावर आघाडी घेतली होती. निलंगा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील हे मोठ्या चौथ्यांदा आमदार होण्यासाठी मताधिक्क्याने आघाडीवर होते.

औसा मतदारसंघातही विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्या विकासरथाला मतदारांनी चांगलीच साथ देत त्यांना दुसऱ्यांदा विजयी आघाडी दिली. लातूर ग्रामीण मतदारसंघात मात्र, मतदारांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना मतदारांनी पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार कराड यांना आघाडी दिली. कराड हे शेवटपर्यंत चार हजाराच्या मतांनी आघाडीवर होते. लातूर शहर मतदारसंघातही भाजपच्या चाकूरकरांनी काँग्रेसचे देशमुख यांच्यासमोर पहिल्या फेरीपासून आव्हान उभे केले होते. शेवटच्या फेरीपर्यंत दोघांत टक्कर सुरू होती.

धाराशिव मतदारसंघात मतदारांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे (उबाठा) कैलास घाडगे पाटील यांना मतदारांनी विजयी कौल दिला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाटील यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. उमरगा (अजा) मतदारसंघात मात्र, शिवेसनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना नाकारत शिवसेनेचे (उबाठा) प्रवीण स्वामी यांना पसंती दिली. आमदार चौगुले यापूर्वी तिसऱ्यांदा निवडून आले होते.

तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना दुसऱ्यांदा विजयाचा कौल मतदारांनी दिला असून परांडा मतदारसंघातून डॉ. सावंत व मोटे यांच्यात शेवटपर्यंत काट्याची टक्कर सुरू होती. फेरीनिहाय आघाडी कमीजास्त सुरू होती. डॉ. सावंत यांनी मतदारसंघात मोठी विकास कामे केली तरी त्यांना मतदारांना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र होते. दरम्यान दोन्ही जिल्ह्यात दुपारी चारपर्यंत मतमोजणी सुरू होती. संथगतीने मतमोजणी सुरू असतानाच कार्यकर्त्यांकडून उमेदवार विजयी झाल्याच्या बातम्या सोशल मिडियावर पसरवल्या जात होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Patil NCP-SP : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटका; तरिही सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचाच

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

SCROLL FOR NEXT