Kapus Soybean Anudan Agrowon
ॲग्रो विशेष

Kapus Soybean Anudan : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी शेवटची संधी ; आजच आधार संमती आणि ना हरकत देण्याचे आवाहन

Cotton, Soybean : राज्य सरकारने खरिप हंगाम २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांंनी अनुदानासाठी आधार संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही.

Anil Jadhao 

Cotton Soybean Subsidy : पुणेः राज्य सरकारने खरिप हंगाम २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांंनी अनुदानासाठी आधार संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. पात्र शेतकऱ्यांनी आजच कृषी विभागाकडे ही कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

खरिप हंगाम २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाला कमी बाजारभाव मिळाला होता. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने २ हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले. तसेच जास्तीत जास्त अनुदान १० हजार रुपये देण्यात येत आहे.

सुरुवातीला कृषी विभागाने एका शेतकऱ्याला जास्त क्षेत्र असेल आणि दोन्ही पीके असतील तर सोयाबीनसाठी २ हेक्टर आणि कापसासाठी २ हेक्टरसाठी असे २० हजार रुपये मिळतील, अशी माहीती दिली होती. मात्र आता अनुदान जास्तीत जास्त १० हजार दिले जात आहे. 

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे रितसर कागदपत्रे जमा करण्यास सांगतिले होते. राज्यात जवळपास ९६ लाख खातेदार आहेत. मात्र यापैकी आतापर्यंत जवळपास ६० टक्क्यांपर्यंतच शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कागदपत्रे जमा केली आहेत. अजूनही अनेक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजच कृषी विभागाला आधार संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यासाठी २८ फेब्रुवारी शेवटची तारिख आहे. मात्र याला मुदतवाढही मिळू शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

काय आहे पात्रता? 
खरिप हंगाम २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेले शेतकरी. या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद केलेली असावी. किंवा सात बारावर पिकाची नोंद असावी. हे शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांनी कृषी विभागात कागदपत्रे सादर करून आधार संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT