Land Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Land Survey : रोवरने जमीन मोजणी होणार गतीने

Bhumi Abhilekh Department : बांधावरून भावकीचे आपापसांत वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही.

Team Agrowon

Jalgoan News : भूमिअभिलेख विभागाला रोवर युनिट मशिन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शेत जमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तत्काळ मोजणी करता येऊन जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे.

बांधावरून भावकीचे आपापसांत वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार असून, शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी रोव्हर मशिन वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर, उपअधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे, नगर भूमापन अधिकारी पी. एस. पाटील उपस्थित होते.

या वर्षी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पंधरा रोवर मशिन वाटप करण्यात आल्या. यासाठी १ कोटी ८० लक्ष निधीची जिल्हा नियोजन मधून तरतूद करण्यात आली, तर मागील वर्षी १२‎ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे‎ भूमिअभिलेख कार्यालयास‎ देण्यात आली आहेत.

यासाठी १ कोटी‎ २० लाख निधी खर्च केले गेला होता. भूमिअभिलेख कार्यालयातर्फे‎ जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या‎ अभिलेख्यांचे जतन करण्यासह‎ नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या‎ जमिनींचे मापन करण्यात येते. यात‎ हद्दी निश्‍चित केल्यानंतर बिनशेती,‎ ले-आउट, भूसंपादन, भूप्रदान‎ आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख‎ तयार केले जातात.

आजवर या सर्व‎ प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक‎ पद्धतीत पार पाडल्या जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ‎ तर लागतेच पण अनेक ठिकाणी‎ झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे‎ जमीन मोजणीत मोठ्या अडचणी‎ येत होत्या. रोवर यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध‎ शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक‎ असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होणार आहे.

अचूकता, पारदर्शकता येणार

या मशिनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते. अचूकता आणि पारदर्शकता ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. या मशिनच्या साह्याने मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. रोवर मशिनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशिनद्वारे जमिनीची मोजणी करता येते.

प्रास्ताविकात जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर यांनी योजनेची माहिती विशद करून होणारे फायदे सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप अधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे यांनी केले. तर आभार पी. एस.पाटील, नगर भूमापन अधिकारी यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT