Railway Agrowon
ॲग्रो विशेष

Railway Land Acquisition : कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी भूसंपादन सुरू

Land Acquisition Process : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याने मुरबाड शहरात रेल्वे येणारच याची खात्री नागरिकांना पटली आहे.

Team Agrowon

Murbad News : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याने मुरबाड शहरात रेल्वे येणारच याची खात्री नागरिकांना पटली आहे. आता रेल्वेमार्गासाठी जागा द्यायची की आक्षेप नोंदवायची, अशी चर्चा सुरू आहे.

कल्याण व मुरबाड तालुक्यातील जमिनी रेल्वेसाठी संपादन केल्या जाणार आहेत. त्यासंबंधी कोणाला आक्षेप असेल, तर ३० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्याकडे हरकत नोंदवायची आहेत, असे रेल्वेतर्फे जाहीर केले आहे.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी मोहने, अटाळी, आंबिवली, बल्यानी, मोहीली, उंभारणी, मानिवली, रायते, गोवेली, रेवती, नवगाव, कोलंब, केळनी, मामनोली, पोटगाव, घोरले, नांदेनी, पशेनी, देवपे, देवगाव, माळीनगर , शास्त्रीनगर, मुरबाड या गावांतील जमिनी जाणार आहेत. ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना भूसंपादनाचा मोबदला किती मिळतो, याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

‘येणारे’ रॅप साँगची निर्मिती

एकीकडे रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. तर मुरबाड रेल्वेच्या प्रश्नावर सर्वधर्म समभाव कलाग्रुप मुरबाड या संस्थेने ‘येणारे’ या रॅप साँगची निर्मिती केली आहे. टीम टेन मुरबाड या चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित केले असून, त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

ज्यांनी भारताला रेल्वे दिली त्यांच्या मूळ गावी रेल्वे नाही, याची खंत मुरबाडकरांना आहे. तिच खंत या गाण्यातून मांडण्यात आली आहे. हे गाणे शरद टोहके यांनी शब्दबद्ध केले आहे. जनार्दन भिसे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

जयसिंग धनगर यांनी आवाज दिला आहे. तर जय मनोरे यांचे छायाचित्रण व पंकज हरड यांनी संकलन केले आहे. कला दिग्दर्शन संदेश डोंगरे व नंदू शिंदे यांनी, तर स्नेहल भालेराव व कृष्णकांत अहिरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. कृष्णा महाजन निर्माता आहेत. या गाण्यात सर्व कलाकार स्थानिक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील

Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल

Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?

SCROLL FOR NEXT