Land Acquisition  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : भूसंपादनाचा वाद चिघळणार

Land Acquisition Compensation : खोपोली-शहापूर-मुरबाड हा राष्ट्रीय महामार्ग कर्जत तालुक्यातून गेला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्‍या, मात्र काहींना १२ वर्षांनंतरही मोबदला मिळालेला नाही.

Team Agrowon

Neral News : खोपोली-शहापूर-मुरबाड हा राष्ट्रीय महामार्ग कर्जत तालुक्यातून गेला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्‍या, मात्र काहींना १२ वर्षांनंतरही मोबदला मिळालेला नाही.

त्‍यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून मोबदला मिळाला नाही, तर रस्त्यावर लागवड करू, असा इशारा देण्यात आला आहे. अशीच भूमिका कल्‍याण, मुरबाड येथील शेतकऱ्यांनी घेतल्‍याने महामार्गातील भूसंपादनाचा वाद चिघळण्याची शक्‍यता आहे

कर्जत-मुरबाड हा आधी एकपदरी मार्ग होता. सरकारने २०११ मध्ये खोपोली, हाळ फाटा ते कर्जत, मुरबाड, शहापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ अ घोषित करण्यात आला. त्यासाठी अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र हाळ फाटा ते कर्जत फाट्यापर्यंत काम करताना शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्याआधीच ठेकेदाराने काम सुरू केले.

यात ज्‍या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, त्‍यांनी रस्‍ता अडवून ठेवला. त्‍यामुळे ठेकेदाराने उपलब्ध जागेनुसार रस्ता तयार केला. परिणामी आजही ९० किमी लांबीच्या रस्‍त्‍यावर अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. महामार्गामुळे शेतजमीन बाधित झालेले हाळ फाटा ते कर्जत वर्णे येथील शेतकरी १२ वर्षांपासून मोबदल्यासाठी लढा देत आहेत. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.

हाळ फाटा ते कर्जत, मुरबाड, शहापूर या राष्‍ट्रीय महामार्गाची निर्मिती एमएमआरडीएने केल्‍याने भूसंपादनही त्‍यांनीच करणे अपेक्षित होते. मात्र त्या वेळी काही कारणाने हाळ फाटा ते कर्जत फाटा येथील भूसंपादन पूर्ण झाले नाही. याप्रकरणी शेतकऱ्यांबरोबरच बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्‍याला यश आले नाही. स्थानिक आमदार, एमएमआरडीए, शेतकरी यांची संयुक्त बैठक घेउन लवकरात लवकर याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- रमेश माने, प्रभारी सल्लागार, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ
२०११ मध्ये अधिसूचना काढून आमच्या जमिनीतून रस्ता नेणार, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे सुरू असलेले रस्त्याचे काम अडवले होते. त्‍या वेळी शेतीचा योग्‍य मोबदला दिला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र बारा वर्षांनंतरही अद्याप मोबदल्‍याची प्रतीक्षा कायम आहे. त्‍यामुळे आता आमच्या शेतजमिनी ताब्यात घेऊन त्यावर शेती, वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्रवीण हडप, बाधित शेतकरी, कर्जत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT