Lalkandhari Cow Agrowon
ॲग्रो विशेष

Lalkandhari Cow Breed : लालकंधारीने दिले १६ वेत...

अमित गद्रे

Pune News : लालकंधारी गोवंश हा मराठवाड्याचे भूषण. ओढकामाच्या बरोबरीने दुधासाठी देखील हा गोवंश आता ओळखला जाऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे जातिवंत पैदास, वासरांचे चांगले संगोपन आणि हवामान बदलाचा ताण सहन करण्याची क्षमता.

या गोवंशाला राष्ट्रीय पातळीवर नेणारे मावलगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील प्रयोगशील पशुपालक शरद पाटील यांच्या ‘जानकी’ गाईने नऊ दिवसांपूर्वी सोळावे वेत दिले आणि गोठ्यात ‘गणेश’ जन्मला. जातिवंत पैदास, योग्य आहार आणि आरोग्य व्यवस्थापन असेल तर गाय सोळावे वेत शेतकऱ्याच्या गोठ्यात देऊ शकते, ही देशी गोवंशाची ताकद आहे.

याबाबत शरद पाटील म्हणाले की, माझ्या गोठ्यात ४४ वर्षांपासून जातिवंत लालकंधारी गोवंश आहे. माझी ‘लक्ष्मी’ गाय अखिल भारतीय पशुप्रदर्शनात चॅम्पियन ठरली होती. ‘जानकी’ ही लक्ष्मीची कालवड. जानकीने आजपर्यंत दहा गोऱ्हे आणि सहा कालवडींना जन्म दिला आहे. जातिवंत पैदास असल्याने सर्व गोऱ्हे प्रयोगशील पशुपालकांकडे तसेच कणेरी मठामध्ये पैदाशीसाठी गेले आहेत. जानकीपासून तयार झालेल्या कालवडींचे दूध उत्पादनही चांगले आहे. जानकी गाय सकाळी चार आणि संध्याकाळी चार लिटर दूध देते. मी मावलगाव येथे लालकंधारी गोसंवर्धन केंद्राची स्थापना केली. तसेच लालकंधारी पैदासकार संघटनेचा सचिव म्हणून कार्यरत आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील निवृत्त पशू तज्ज्ञ डॉ.नितीन मार्कंडेय म्हणाले की, सुदृढ निरोगी शरीर आणि प्रतिबंधात्मक प्रजनन व्यवस्थापनाच्या बळावर दरवर्षी मिळणारे वेत हा आदर्श पाठ असतो. वेळेवर गर्भधारणेसाठी नेहमी प्रयत्न झाल्यास हमखास आर्थिक पाठबळ मिळते. पंधरा वेतानंतर दूध देण्याची क्षमतेचा विचार न करता जातिवंत सुदृढ सुलभ प्रजननशील तयार होणारी पिढी अनमोल असते.

पाटलांकडील लालकंधारी गोवंश

सध्या पाच लालकंधारी गाई, एक पैदाशीचा वळू आणि पाच लहान कालवडी.

जातिवंत दुधाळ गाईचे सरासरी प्रति दिन ८ ते १० लिटर दूध उत्पादन.

प्रजनन, आहार, आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष. अर्ध बंदिस्त पद्धतीने व्यवस्थापन.

ग्राहकांच्या मागणीनुसार वर्षभर तूप, गोखूर खत, जीवामृत, दशपर्णी अर्क विक्री. दरवर्षी पाच कालवडी किंवा गोऱ्ह्याची विक्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा इशारा; ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Advance Crop Insurance : शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळवून द्या

Onion Import : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू नये, अशी सरकारची नीती; कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Soybean Rate Issue : सोयाबीन पिकाला ८ हजार ५०० रुपये भाव देण्याची मागणी

Khandesh Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ; पिकांना फटका

SCROLL FOR NEXT