Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ बंद होणार नाही

Eknath Shinde : महायुती सत्तेत आल्यानंतर अनेक लोकोपयोगी योजना अमलात आणल्या. त्यात लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे. योजनेची घोषणा होतानाच अनेकांच्या पोटात दुखने सुरू झाले.

Team Agrowon

Wardha News : महायुती सत्तेत आल्यानंतर अनेक लोकोपयोगी योजना अमलात आणल्या. त्यात लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे. योजनेची घोषणा होतानाच अनेकांच्या पोटात दुखने सुरू झाले. मात्र योजना आजही सुरू आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असा शब्द लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ध्यातून दिला. \

सेवाग्राम येथील चरखा गृहात आयोजित मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचे मंगळवारी (ता. २२) त्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त हे शिबिर आयोजित होते. १४ ऑगस्ट रोजी त्याचा समारोप होणार आहे.

या वेळी व्यासपीठावर मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र बोंडेकर, पद्मश्री विकास महात्मे, तात्याराव लहाने, देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने, किरण पांडव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करीत महात्मा गांधी अमर रहे’ असा नारा देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वर्ध्यात सुरू करण्यात आलेले मोतीबिंदू मुक्त वर्धा अभियानाचे कौतुक केले. असे शिबिर इतरांनी राबवून सामान्यांची सेवा करावी, असा सल्ला दिला.

विरोधातील अनेकांना दृष्टिदोष

महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. असे असताना अनेकांना दृष्टिदोष झाल्याप्रमाणे त्यांना चांगले दिसत नाही. त्यांच्या दृष्टीचाही उपचार करण्याची गरज आहे.

त्यांच्याकडून टीका, आरोप मोठ्या प्रमाणात होतात. अशांच्या तोंडी लागण्यापेक्षा त्यांना कामातून उत्तर देणे योग्य असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस सत्तेत असताना त्यांनी महाराष्ट्रातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याकरिता जलशिवार योजना अंमलात आणली. सोबत शेतकरी हिताच्या अनेक योजना होत्या. त्या योजना महाविकास आघाडीने बंद करण्याचे पाप केल्याचा आरोपही त्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT