Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : शिंदे

Eknath Shinde: गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून झपाटून काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विश्वास आमच्या सरकारवर आहे. विधानसभा निवडणुकीत मिळवलेले यश सर्वसामान्यांच्य विश्वासाचे आहे. कुणी काही म्हणाले तरी ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही.

मुकूंद पिंगळे

Nashik News: गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून झपाटून काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विश्वास आमच्या सरकारवर आहे. विधानसभा निवडणुकीत मिळवलेले यश सर्वसामान्यांच्य विश्वासाचे आहे. कुणी काही म्हणाले तरी ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) या आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी (ता. १४) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे, इगतपुरी-त्रंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, की ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यासाठी आदर्श शाळा काम करण्यासाठी काम करावे लागेल. राज्यभरात दुर्गम भागातील हिवाळीसारख्या मॉडेल शाळा उभारा, असे आवाहन त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT