Labor Migration Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Migration : सातपुडा पहाडातील मजूर कामाच्या शोधात

Kharif Season : सद्यःस्थितीत सातपुडा पहाडात मजुरांसाठी काहीच काम नसल्याने या भागातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवरील गावांमध्ये आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : सद्यःस्थितीत सातपुडा पहाडात मजुरांसाठी काहीच काम नसल्याने या भागातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवरील गावांमध्ये आले आहे. सातपुडा पहाडातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गावांमध्ये या दिवसात बागायती क्षेत्र नसल्याने मजुरांसाठी येणाऱ्या खरीप पेरणीपर्यंत कुठलेच काम नसल्याने मजुरांच्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ आली आहे.

सध्या सातपुड्याच्या पहाडपट्यात शुकशुकाट असल्याने हे मजूर घरीच असतात.त्यामुळे काम करून काहीतरी कमावता येईल हा उद्देश घेऊन हे मजूर आपले बिऱ्हाड डोक्यावर घेऊन सपाटीवरील गावांमध्ये दोन-तीन महिन्यांसाठी येत असते.

सद्यःस्थितीत खानदेशातील अक्कलकुवा, खापर ,तळोदा, शहादा ,शिरपूर ,चोपडा ,यावल, भुसावळ,मुक्ताईनगर या सातपुडा लगत असलेल्या तालुक्यांच्या उत्तर सिमेकडील पर्वत रांगांमधील गावांमध्ये असलेले मजूर सध्या मिळेल त्या कामासाठी सपाटीवरील गावांमध्ये आलेले आढळून आले आहे.

मजुरांकडून सध्या कांदा काढणी, मका कापणी व काढणी, ज्वारी ,बाजरी कापणी, खतांची वाहणी ,मूग तोडणी ,कडबा कुट्टी वाहने ,भुईमूग उपटणी यासह शेती तयार करणे यासह यावलकडील भागात केळी पिकातील कामे व अन्य मिळतील ती कामे या मजुरांकडून केली जात असल्याने त्यांना रोख रकमेसह ज्वारी बाजरी मिळत असल्याने पावसाळ्यातील खाण्यापिण्याची सोयही होणार आहे.

हे मजूर सध्या ठराविक रकमेवर किंवा रोजंदारीने काम करत असून त्यांना दिवसाकाठी अडीचशे ते चारशे रुपये रोज मिळत असल्याने पावसाळ्यातील खर्चाची तरतूद होण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT