Farm Labor Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : शेतीसाठी कामगार टंचाईचा प्रश्न कायम, शेतकरी अडचणीत

Agriculture Work : खानदेशात शेतकऱ्यांना मजूरटंचाईचा सामना अनेक दिवसांपासून करावा लागत आहे. आता पीक कापणी, मळणी, काढणी, फवारणी आदी शेतीकामे सुरू झाली आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात शेतकऱ्यांना मजूरटंचाईचा सामना अनेक दिवसांपासून करावा लागत आहे. आता पीक कापणी, मळणी, काढणी, फवारणी आदी शेतीकामे सुरू झाली आहेत. परंतु मजूरटंचाई अनेक भागात कायम आहे.

खरिपातही अशीच समस्या होती. त्या वेळेस सततच्या पावसाने तणनियंत्रण, फवारणी, काढणी, मळणीची कामे ठप्प झाली होती. यातच सणासुदीतही शेतकऱ्यांनी शेतात कापणी, काढणी, फवारणीची कामे हाती घेतली होती. कारण ही कामे वेळेत न झाल्यास नुकसान होते. तणनियंत्रणदेखील हलक्या, मध्यम जमिनीत सुरू होते. आता पुन्हा रब्बीची कामे शिवारात वेगात सुरू झाली आहेत.

मध्यंतरी लाडकी बहीण योजनेनंतर मजूरटंचाई वाढली. ती कायम आहे. सणासुदीला मजुरही सुट्टीवर होते. केळी, पपईची काढणी, कापूस खरेदीदेखील रखडली होती. परंतु ही कामे आता गावोगावी सुरू झाली आहेत. कापूस पीक कमी आहे. परंतु आता एकाच वेळी केळीत तणनियंत्रण, पीक काढणी, कापणी, हरभरा कापणी आदी कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत.

यामुळे मजूरटंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात कोरडवाहू ज्वारी, हरभरा पिकात कापणीचे काम सुरू आहे. काही भागात कापूस पिकात बोंडे उमलत आहेत. त्यात वेचणी सुरू आहे. २०० रुपये किमान मजुरी दर आहेत. कामाचे तास व इतर बाबी लक्षात घेऊन अनेक मजुरी शेतकरी मजुरांना देत आहेत.

सातपुडा भागातील मजुरांचा आधार

काही मजूर सातपुडा पर्वत भागातून खानदेशात दाखल झाले आहेत. यातच काही भागात मात्र मजूरटंचाई कमी आहे. पाचोरा, जामनेर, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, जळगाव या भागातील अनेक गावांत मजूर पुरेसे आहेत.

परंतु चोपडा,यावल, रावेर, जळगावचा तापीकाठचा भाग, नंदुरबारातील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपुरात मजुरांची मागणी अधिक आहे. यामुळे अन्य भागातून मजुरांची आयात करावी लागत असून, शेतकरी फवारणी व अन्य कामांसाठी मजुरांची शोधाशोध करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT