Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : मजुर टंचाईचा फटका ; वेचणीअभावी कापूस झाडावरच

Cotton Picking : यंदा बाहेरील मजूर कापूस वेचणीला आले नाही. त्यामुळे वेचणीअभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : कापूस नगदी पीक आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पिकांची लागवड करतात. यंदा बाहेरील मजूर कापूस वेचणीला आले नाही. त्यामुळे वेचणीअभावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. काही शेतकऱ्यांवर दोन वेळेची कापूस वेचणी एकाच वेळेस करावी लागत आहे. त्यामुळे लाखमोलाचा कापूस अजूनही झाडावरच आहे.

यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी संपायला तयार नाही. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे.

नापिकीने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. शेतकऱ्यांना कापूस वेचणी करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. कापूस वेचणी करण्यासाठी अजूनही मजूर मिळत नसल्याने झाडावरच शिल्लक आहे.

कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने मजुरांअभावी शेत कापसाचे पांढरे रान झाल्याची स्थिती राजुरा तालुक्यात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मजूर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांवर दोन वेळेची कापूस वेचणी एकाचवेळी करण्याची पाळी आली. आता कापूस झाडावरच हलका आल्याने मजूर कापूस वेचणी करायला तयार नाही.

कापूस उत्पादकांचे हाल यंदा संपायला तयार नसल्याने शेतकरी काकुळतीला आले आहे. कापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे. सुरुवातीपासून शेतकऱ्यांना कापूस पिकांवर जास्त खर्च करावा लागतो. त्या तुलनेत कापूस शेतकऱ्यांना परवडत नाही.

यंदा कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने ११ रुपये प्रति किलो प्रमाणे कापूस वेचणी करावी लागत आहे किंवा बाहेरून ऑटोने मजूर आणून कापूस वेचणी करावी लागत आहे.

राजुरा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. दिवसेंदिवस मजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांच्या शोधत फिरावे लागत आहे.
- चेतन बोभाटे, युवा प्रगतिशील शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT