Farm Labor Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Labor Shortage : बारामतीच्या जिरायती भागात खरीप हंगामात मजूर टंचाई

Kharif Season : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मजूर टंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Baramati News : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मजूर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी एकमेकांत सावडीचा ओरंगळीचा करण्याचा जुना पारंपरिक मार्ग सुरू केला आहे.

बारामतीच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, बऱ्हाणपूर, खराडेवाडी, उंडवडी कप, गोजुबावी व जराडवाडी आदी परिसरात खरीप हंगामपूर्व व पेरण्यानंतर आवश्यक पाऊस वेळोवेळी पडला आहे.

त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा आदी पिके शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत. खरिपातील बहुतांशी पिके अंतिम टप्प्यांत आली असून आहे. बाजरी, मका व मुगाची काढणी एकाच वेळी सुरू झाली आहे.त्यामुळे शेतकरी सुगीच्या कामात गुंतले आहेत. तर दुसरीकडे शेतीकामासाठी मजुरांची भीषण टंचाई जाणवत आहे.

मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा

उंडवडी सुपे परिसरात शेतीला पूरक असलेला दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मका या पिकाची लागवड केली जाते.

सध्या बहुतांशी मक्याची पिके कापणीला आली असून, शेतकरी मक्यापासून मुरघास तयार करून ठेवत आहेत. याकामासाठी ट्रॅक्टरचलित कुटी मशिन व मजुरांची आवश्यकता असते. याकामासाठीदेखील कुटी मशिनसह मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT