PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : सहा हजार ३२९ लाभार्थ्यांचे केवायसी प्रलंबित

PM Kisan KYC : जिल्ह्यात प्रधानमंत्री सन्मान निधीकरिता २ लाख ४९ हजार २६ शेतकरी पात्र आहे. यापैकी २ लाख ४२ हजार ६९७ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत.

Team Agrowon

Chandrapur News : जिल्ह्यात प्रधानमंत्री सन्मान निधीकरिता २ लाख ४९ हजार २६ शेतकरी पात्र आहे. यापैकी २ लाख ४२ हजार ६९७ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत. ६३२९ लाभार्थ्यांचे प्रलंबित आहे. तसेच २ लाख ४४ हजार ८९२ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले. ६७६५ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग करणे बाकी आहे. ५८१ शेतकऱ्यांची पडताळणी प्रलंबित आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पीएम किसान पोर्टलवर प्रलंबित असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतीक कारपेनवार यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ‘‘पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याकरिता संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण आणि आधार सीडिंग त्वरित करून घ्यावे. तसेच तहसीलदारांनी संबंधित लाभार्थ्यांचा, एक फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा ७-१२ बघून त्वरित निपटारा करावा.

जेणेकरून कोणीही सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार नाही. सोबतच तालुकानिहाय माहिती घेऊन ई-केवायसी आणि आधार सीडिंग प्राधान्याने करून घ्यावे. जिल्ह्यात मंडळ स्तरावरील हवामानाचा अंदाज घेणारे सर्व यंत्र सुस्थितीत आहे की नाही, याची पडताळणी करून यंत्र दुरुस्त करून घ्यावे.

याबाबत तहसीलदारांनी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक आणि स्कायमेटच्या प्रतिनिधींची तालुका स्तरावर बैठक घ्यावी,’’ अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT