Krushik 2025 Exhibition  Agrowon
ॲग्रो विशेष

Krushik 2025 Exhibition : बारामतीत १६ पासून ‘कृषिक-२०२५’ प्रदर्शन

KVK Baramati : जगविख्यात संस्थांच्या सहकार्याने ‘अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ बारामतीमध्ये ‘कृषिक २०२५’ सारखे विविध उपक्रम राबवीत आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट व जगातील सर्वोत्तम ऑक्स्फर्ड विद्यापीठ, लंडन या संस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.

Team Agrowon

Baramati News : जगविख्यात संस्थांच्या सहकार्याने ‘अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ बारामतीमध्ये ‘कृषिक २०२५’ सारखे विविध उपक्रम राबवीत आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट व जगातील सर्वोत्तम ऑक्स्फर्ड विद्यापीठ, लंडन या संस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यातून यशस्वी ठरलेले कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे विविध उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतीला दिशादर्शक ठरत आहेत, असे मत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत बारामती-शारदानगर येथे ‘कृषिक २०२५’ हे जागतिक स्तरावरील शेतीविषयक प्रात्याक्षिकयुक्त कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. कृषिक हे कृषी प्रदर्शन १७० एकर क्षेत्रावर उभारले आहे. गुरुवार ते सोमवार (ता.१६ ते २०) या कालावधीत हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आयोजित केले आहे. तत्पूर्वी कृषिकचे औपचारिक उद्‍घाटन बुधवारी (ता.१५) होणार आहे.

ज्येष्ठ नेते व ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विषयीची माहिती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकारांना दिली. राजेंद्र पवार म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांच्या ऊस पिकात अधिक प्रभावीपणे करणे व त्या अनुषंगाने कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याची प्रक्रिया माहिती करून घेण्यासाठी यंदाचे कृषिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ऑक्स्फर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट कंपनी, अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आदी संस्था एकत्र आलेल्या आहेत. आमचे संशोधन, तंत्र व संकल्पना प्रत्यक्षात कसे कार्य करतात, हे येत्या ‘कृषिक २०२५’ या कृषी प्रदर्शनात सर्वांना बघण्यास मिळणार आहे. कृषिक प्रदर्शनातून बहुसंख्य शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि उद्योजकांना कृषी क्रांतीची नवीन दिशा मिळणार आहे.

वास्तविक परदेशात ज्या पद्धतीने प्रात्याक्षिक आधारित प्रदर्शन पाहावयास मिळते. नवीन बियाणे, तंत्रज्ञान, खते केवळ पिशव्यांमधून दाखविण्याऐवजी त्यांचा वापर प्रत्यक्ष शेतीत यशस्वी झाल्याचे प्रयोग परदेशात पाहावयास मिळतात. त्याच धर्तीवर खरेतर आम्ही बारामती ट्रस्टच्या माध्यमातून गेली १० वर्षे कृषी प्रदर्शन भरवीत आहोत. या वेळी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ नीलेश नलावडे उपस्थित होते.

कृषिक प्रदर्शनात यंदाचे मुख्य आकर्षण

देशातील पहिले फार्म ऑफ द फ्यूचरची उभारणी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे वाढवलेला ऊस, नावीन्यपूर्ण फळझाडांची लागवड, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके, शेवंतीच्या २९ प्रकारची फुलशेती, काळा टोमॅटोसह २९ प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण, काळी मिरची व मिरचीचे विविध प्रात्याक्षिके, जिरायती शेतीसाठी ज्वारीचे विविध वाण व तुर्की बाजरी, कापसाची नवी तंत्रज्ञानावर आधारित लागवड व काढणी प्रात्याक्षिके, स्वतंत्र पशुदालन, भरडधान्य पाहावयास मिळणार आहे. तसेच नेदरलॅंड, चीन, अमेरिका, इस्राईल, ब्राझील, स्पेन, इटली, आफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड (UK), ऑस्ट्रेलिया आदी देशांतील विविध एआय-सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान पाहण्याची शेतकऱ्यांना प्रदर्शनात संधी मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT