Krishi Vidnyan Kendra Agrowon
ॲग्रो विशेष

KVK Badnapur : कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर

Dr. Indra Mani : कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर आहे. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Jalna News : कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर आहे. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

वनमकृवि कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ८) कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे नवीन शेतकरी निवास इमारतीचे भूमिपूजन पार पडले. त्या वेळी बोलत होते. या सोहळ्याला संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शाखा अभियंता अहमद शेख, प्राचार्य कृषी महाविद्यालय बदनापूर डॉ. राकेश अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, की नवीन शेतकरी निवास बांधल्याने दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांना निवासी प्रशिक्षण घेणे अधिक सोईस्कर होईल. ‘वनामकृवि’चे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी नवीन शेतकरी निवास बांधकामाबाबत सविस्तर माहिती दिली.

ते बोलताना म्हणाले, की नवीन शेतकरी निवास ३० शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्थेसह, भोजन व्यवस्था आणि इतर सुविधांनी युक्त असेल. कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरच्या वतीने डॉ. सचिनकुमार सोमवंशी यांनी भा. कृ. अनु. प. नवी दिल्ली, मा. उपमहानिदेशक भा. कृ. अनु. प, अटारी, पुणेचे संचालक, यांचे सदरील शेतकरी निवास इमारतीकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एल. कदम यांनी केले. या सोहळ्याप्रसंगी प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, डॉ. संजय पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक पाटील आणि प्राध्यापक, अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT