Pre-kharif review meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Kharif Review Meeting : खरीप हंगामात राबवणार ‘कृषी वसंत’ अभियान

Krishi Vasant Abhiyan : आगामी खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कृषी वसंत अभियान हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. घरगुती बियाणे महोत्सव, बीज प्रक्रिया, युरियाचा वापर कमी करणे, मागेल त्याल शेततळे आदी उपक्रम याअंतर्गत राबवले जातील,

Team Agrowon

Akola News : आगामी खरीप हंगामात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कृषी वसंत अभियान हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. घरगुती बियाणे महोत्सव, बीज प्रक्रिया, युरियाचा वापर कमी करणे, मागेल त्याल शेततळे आदी उपक्रम याअंतर्गत राबवले जातील, अशी माहिती बुधवारी (ता.२४) येथे झालेल्या जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत देण्यात आली.

आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली या खरीप आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश घाटोळ, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ.उमेश ठाकरे, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, उपविभागीय कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. किरवे यांनी बैठकीत खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील प्रस्तावित पिकांचे क्षेत्र व उत्पादकता, लागणारे बियाणे, खते व कीटकनाशके यांचे नियोजन, पावसाचा अंदाज, जिल्ह्यातील पिकांचे विविधीकरण, पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना, पीकविमा आदी योजनांविषयी सादरीकरण केले.

जिल्ह्यात चार लाख ४३ हजार हेक्टर वहितीखालील क्षेत्र असून सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके आहेत. त्यामध्ये २ लाख ३७ हजार हेक्टरवर सोयाबीन प्रस्तावित असून एक लाख ३६ हजार हेक्टरवर कपाशी प्रस्तावित आहे. जिल्हाधिकारी कुंभार यांनी, जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र कमी करून त्याला पर्यायी पिकांचे क्षेत्र वाढवण्याची सूचना केली.

तसेच येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कृषी वसंत अभियानाची अंमलबजावणी करण्याचे सूचवले. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून जास्तीत जास्त शेतीक्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आदेश संबंधितांना दिले. डॉ. इंगळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, परंपरागत कृषी विकास योजना, सेंद्रिय शेती आदी योजनांचे सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT