Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Alphonso Mango Export : नवी मुंबईतून ८३१ टन हापूसची निर्यात

India Mango Market : नवी मुंबईतील कृषी पणन मंडळाच्या अत्याधुनिक विकिरण सुविधेमुळे अवघ्या १७ दिवसांत तब्बल ८३१ टन हापूस आंबा परदेशात पाठवण्यात आला आहे.

Team Agrowon

Washi News : कोकणातील सुप्रसिद्ध हापूस आंब्याची जादू आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पसरली आहे. नवी मुंबईतील कृषी पणन मंडळाच्या अत्याधुनिक विकिरण सुविधेमुळे अवघ्या १७ दिवसांत तब्बल ८३१ टन हापूस आंबा परदेशात पाठवण्यात आला आहे.

यापैकी सर्वाधिक ३७२ टन आंबा अमेरिकेच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे; तर युके आणि युरोपमधील ग्राहकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. कोकणच्या भूमीत पिकलेला हापूस आंबा आता केवळ देशातच नव्हे; तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियासारख्या दूरवरच्या देशांतील लोकांच्या जिभेवर रेंगाळत आहे.

त्याच्या मनमोहक सुगंध आणि अतुलनीय चवीमुळे जगभरातील ग्राहक या फळाचे दिवाणे झाले आहेत. या वाढत्या मागणीमुळे यंदा हापूस आंब्याची निर्यात एक नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आंबा बागायतदार आणि तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या निर्जंतुकीकरण प्रक्रियेवर अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः नवी मुंबईतील केंद्राला भेट देऊन आंब्याच्या गुणवत्तेची कसून तपासणी करत आहेत. त्यांच्या अंतिम मान्यतेनंतरच हापूसची खेप अमेरिकेला रवाना होते.

आंतरराष्ट्रीय निर्यात (टन) (१ ते १७ एप्रिल)

अमेरिका - ३७२

युके - ३२७.६४

न्यूझीलंड - ४.३९

युरोपातील इतर देश - ११५.९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT