Zilla Parishad Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur ZP Budget: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे ४३ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक सादर

Financial Planning 2025-26: कोल्हापूर जिल्हा परिषदेने महिला, शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत ४३ कोटी ६५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. उत्पन्न वाढीसाठी मुद्रणालय सुरू करणे, सभागृह भाड्याने देणे आणि इमारतींचा पुनर्विकास करण्याचा विचार केला जात आहे.

Team Agrowon

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक योजनांमध्ये महिला, शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषदेचा ४३ कोटी ६५ लाख ६ हजार ३६५ रुपये रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. मुख्य लेखाधिकारी अतुल आकुर्डे यांनी हे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्याकडे सुपूर्द केले.

समृद्ध शाळा, समृद्ध दवाखाना, समृद्ध महिला अशी उद्दिष्ट्ये ठेवून हे सर्वसमावेशक अंदाजपत्रक सादर केले आहे. प्राथमिक शिक्षणासाठी पाच कोटी ७१ लाख रुपयांची, आरोग्यासाठी दोन कोटी ८४ लाखांची तरतूद केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेखाली २०२५-२०२६ चे अंदाजपत्रक सादर केले.

कार्तिकेयन एस. म्हणाले, की जिल्हा परिषद स्वनिधीचे व पाणीपुरवठ्याच्या देखभाल दुरुस्ती निधीचे, तसेच पंचायत समिती स्वनिधीचे २०२४-२५ चे ३९ कोटी ७८ लाख २३ हजार ७५८ अंतिम सुधारित अंदाजपत्रक आणि २०२५-२६ चे ४३ कोटी ५१ लाख ७७ हजार २०० रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले.

२०२५-२६ च्या आरंभीच्या शिलकीसह संभाव्य जमा रकमेसह ४३ कोटी ६५ लाख ६ हजार ३६५ रुपयेमधून खर्चासाठी एकूण रक्कम ४३ कोटी ५१ लाख ७७ हजार २०० रुपयांची तरतूद केली आहे. १३ लाख हजार १६८ शिलकीचाही समावेश केला.

ते पुढे म्हणाले, की शासनाने संगणक प्रणालीमुळे तो-तो निधी ज्या-त्या ठेकेदार, कंत्राटदार किंवा इतर कामांसाठी थेट मिळणार आहे. या निधीवर जिल्हा परिषदेला सुमारे १० ते १२ कोटी रुपये व्याज मिळत होते. हे व्याज आता मिळणार नाही. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी मुद्रणालय सुरू करून केले जाईल.

यातून प्रतिवर्षी सुमारे १ ते २ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते. जिल्हा परिषद सभापती निवास्थानासमोरील रिकाम्या जागेमध्ये सभागृह बांधून भाड्याने दिले जाईल. यातून वर्षाला ५० लाख रुपये उत्पन्न मिळेल. भाऊसिंगजी रोड येथील जिल्हा परिषद मालकीच्या इमारतीचा पुनर्विकास केला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT