Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Jilha Dudh Sangh : ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांचा अखेर राजीनामा

Kolhapur Gokul Dudh : कोल्हापूर जिल्हा सहंकारी दूध संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अखेर मंगळवारी (ता. २०) सकाळी राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे देण्यात आले.

sandeep Shirguppe

Kolhapur Gokul Dudh : कोल्हापूर जिल्हा सहंकारी दूध संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अखेर मंगळवारी (ता. २०) सकाळी राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी तातडीने संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्याकडे हे पत्र सादर केले.

गुरुवारी (दि. २२) संचालक मंडळाची बैठक होत असून यामध्ये डोंगळे यांचा राजीनामा मंजूर केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. स्थानिक पातळीवरून हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याने श्री. डोंगळे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

श्री. डोंगळे यांनी राजीनामा देण्याच्या नियोजित बैठकीदिवशी दांडी मारून खळबळ उडवून दिली होती. यानंतर मात्र वरिष्ठ नेत्यांनी श्री. डोंगळे यांना समजवल्याने अखेर त्यांनी राजीनामा देण्यास संमती दिली. नवीन अध्यक्षपदासाठी संस्थापक कै. आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव चर्चेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सिताफळाला चांगला भाव, गवार तेजीत तर हळद-केळी दर स्थिर

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Solar Project Nashik : दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प पूर्ण करा

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Day-Time Electricity : अकोलेकाटी परिसरात दिवसा वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT