Weather Update agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडी तर सांगली जिल्ह्यात पावसाबाबत नवी अपडेट समोर

Sangli Rain Update : सांगली जिल्ह्यात पुढच्या काही दिवसांत पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात होते. परंतु पाऊस नसल्याची माहिती समोर आली आहे.

sandeep Shirguppe

Weather Forecast Sangli Kolhapur : गतवर्षी (२०२३) पाऊस गायब झाला; पण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला थोडीफार सुरूवात झाली. आज १५ ते २० दिवस झाले, थंडीची तीव्रता अजूनही कायम होणार आहे. चार ते पाच दिवसांपासून दिवभर तापमान ३० अंशांपर्यंत असते, तर सायंकाळी सहा ते सातनंतर ते २१ अंशांपर्यंत घसरत आहे. रात्री १२ ते एक नंतर थंडीची आणखी तीव्रता वाढत आहे. दरम्यान डिसेंबरच्या १५ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यात १४ ते २० अंशांपर्यंत तापमानाचा पारा जात असल्याची माहिती समोर आली आहे.

हवामान संकेतस्थळावरील नोंदीनुसार, सर्वसाधारपणे जानेवारीत २९ ते ३१ अंशांपर्यंत तापमान राहणार असल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्याला रब्बी आणि शिल्लक राहिलेल्या उसासाठी ही थंडी उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान थंडीचा माहौल जानेवारी महिन्यातही राहणार आहे. यावर्षी थंडीचीही तीव्रता कायम राहील, असे संकेत संकेतस्थळांवरील नोंदी दर्शवतात.

पाच वर्षांतील नोंदी तपासत्या तर थंडीही अनेकदा जानेवारीनंतर गायब झाली आहे. तीव्र उन्हाचा तडाखा २०१४, २०१७, २०१९ कालावधीत जानेवारीपासूनच सुरुवात झालेला दिसतो. यावर्षी थंडी ही राहील की गायब होईल याबाबत संभ्रम असला तरी पुढचे काही दिवस असेच वातावरण राहणार आहे.

फेब्रुवारीतही थंडी राहील...

१४ फेब्रुवारीपर्यंत ३० ते ३४ अंशांपर्यंत शहर परिसरातील तापमान राहोल, अशा नोंदी काही संकेतस्थळांवरून पाहायला मिळतात. हो मंडी मार्चपर्यंतही राहू शकते. जर वातावरण, हवामान बदलाची स्थिती उत्पन्न झाली नाही तर. २०१४ ते २०२४ पर्यंतचा कालखंड पाहिला तर अनेकदा मार्चपर्यंत वातावरण आल्हाददायक राहिले आहे.

सांगली जिल्ह्यातील हवामान कोरडे

'अॅमिकस अॅग्रो' या हवामान तपासणी संस्थेने म्हटले आहे, की अनुकूल वातावरणामुळे हिंदी महासागरात केरळपासून १४०० किलोमीटरवर कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. तो सरकत केरळपासून ८०० किलमीटरपर्यंत जवळ येईल. त्याचे वादळात रूपांतर न होता तफावत कमी होत जाईल.

पुणे विभागात ४ पासून ११ तारखेपर्यंत वातावरण हलके ढगाळ होत असले, तरीही ५ ते ६ तासांपर्यंत सूर्यप्रकाश मिळू शकतो. आपल्या भागात १५ जानेवारीपर्यंत वातावरण अधूनमधून ढगाळ झाले, तरीही पावसाची शक्यता नाही. जिल्ह्यात द्राक्षावर जीवाणूजन्य करप्याने शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. मागास द्राक्ष फुलोऱ्यात असताना २५ ऑक्टोबरच्या पावसाने दणका दिला. जिल्ह्यातील एक लाख २० हजार एकर द्राक्षक्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावरील म्हणजे ५० हजार एकरातील द्राक्षांना फटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT