Kolhapur Dam agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Kolhapur Dams Condition : सध्या तीनही धरणांतून विशिष्ट प्रमाणात भोगावती, दूधगंगा आणि तुळशी नदीत विसर्ग सुरूच आहे.

sandeep Shirguppe

Radhanagari Dam : मागच्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस कमी झाल्याने धरणांतील पाण्याची स्थिती चिंताजनक असल्याचे बोलले जात होते. परंतु कोल्हपूर जिल्ह्यातील धरणांतील पाण्याची स्थिती २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये चांगली असल्याचा अहवाल समोर आला आहे.

यंदा ४ मेपर्यंत राधानगरी व तुळशी धरणांत जवळपास गतवर्षीइतकाच, तर काळम्मावाडी धरणात एक टीएमसीने अधिक पाणीसाठा आहे.

मॉन्सूनचा पाऊस सुरू होईपर्यंत किमान पुढील दीड महिन्यासाठी पुरेल इतक्या पाण्याची बेगमी तीनही धरणांतील साठ्यामुळे झाली आहे, तरीही शेती आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची पुढील काळातील गरज पाहता उपलब्ध पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. शेतीसाठी १० जूनपर्यंत आणखी दोन आवर्तने मिळण्याची शक्यता आहे.

सध्या तीनही धरणांतून विशिष्ट प्रमाणात भोगावती, दूधगंगा आणि तुळशी नदीत विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता उरलेली नाही आजमितीस काळम्मावाडी धरणात गतवर्षीपेक्षा एक टीएमसीने अधिक, राधानगरी व तुळशीत शंभर एमसीएफटी इतकाच कमी पाणीसाठा आहे. पाण्याचा काटकसरीने वापर आणि अपव्यय टाळण्यावर भर द्यावा लागणार आहे.

४ मे २०२३

राधानगरी २.६५ टीएमसी (३४ टक्के)

तुळशी: १.३४ टीएमसी (४३ टक्के)

काळम्मावाडी ३.८६ टीएमसी (१६.५५ टक्के)

४ मे २०२४

राधानगरी २.५२ टीएमसी (३२ टक्के)

तुळशी १.४६ टीएमसी (४५ टक्के)

काळम्मावाडी ४.६५ टीएमसी (१९३८टक्के)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT