Kolhapur Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा वेढा, धरणे ९० टक्क्यांवर, शिरोळकरांची धास्ती वाढली

Shirol Taluka Flood : कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा-कोल्हापूर आदी शहरात येणारे रस्ते बंद झाले असून, पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sangli Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर धुवाँधार पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ९३ टक्क्यांवर पोहोचले असून धरणातून १५०० क्युसेक विसर्ग आहे. धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख राज्यमार्गांवर पाणी आले. कोल्हापूर-रत्नागिरी, गगनबावडा-कोल्हापूर आदी शहरात येणारे रस्ते बंद झाले असून, पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे.

काळम्मवाडी, तुळशी आणि वारणा धरणाच्या क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक आहे. पंचगंगेची पातळी संथ वाढत असली तरी पावसामुळे चिंता कायम आहे. पाटबंधारे विभागाने आज सकाळी ११ वाजता मिळालेल्या माहितीनुसार पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४२.२ इतकी झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळी गाठण्यासाठी १० इंच पाणी कमी आहे. दरम्यान राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर ८ तासांनी नद्यांच्या पातळीत वाढ होते. धरणाचे दरवाजे पुढच्या काही तासात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोल्हापूर शहरातील मळे स्थलांतरीत

कोल्हापूर शहरातील उलपे मळा, शुक्रवार पेठ, बापट कॅम्प या भागात पंचगंगेचे पाणी आले आहे. त्यामुळे सुतारवाड्यातील आठ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, काही गावांमधील नागरिकांना स्थलांतराची सूचना प्रशासनाने केली आहे. आपत्ती विभागाने एनडीआरएफच्या तुकडीही तैनात ठेवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

राधानगरी ७.७१, तुळशी २.७६, वारणा २९.२८, दूधगंगा १७.६७, कासारी २.०४, कडवी २.५२, कुंभी १.९३, पाटगाव ३.३२, चिकोत्रा ०.९७, चित्री १.८९, जंगमहट्टी १.२२, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.२४, सर्फनाला ०.४८ व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

शिरोळ तालुक्याला महापुराची धास्ती

दमदार पाऊस आणि कृष्णा, पंचगंगा दूधगंगा व वारणा नद्याच्या पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ पाहून तालुक्यातील नदीकाठच्या ४३ गावांतील नागरिकांनी संभाव्य महापुराची धास्ती घेतली आहे. तालुक्यात महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, कर्नाटक राज्याला जोडणारे दत्तवाड-एकसंबा, दत्तवाड - मलिकवाड, घोसरवाड-सदलगा हे प्रमुख मार्ग पाण्याखाली गेले आहेत. तर, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड-नांदणी हा मार्ग व दानोळी कोथळी हा मार्ग पाण्याखाली गेला आहे.

महापुराच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाकडून संजय लोखंडे यांची आपत्ती व्यवस्थापनासंबंधी माहिती देण्यासाठी नियुक्ती झाली आहे. मात्र, चार दिवसांपासून पूर परिस्थितीची माहिती घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी संपर्क केला असता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT